'एन्ग्झायटी डिप्रेशन' लक्षणे आणि उपाय
जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या एका आकडेवारीनुसार 2020 पर्यंत 'एन्ग्झायटी डिप्रेशन' हा जगातील दुसरा मोठा आजार ठरणार आहेत. गेल्या दशकाच्या तुलनेत या आजारात आता 18 टक्क्यांची वाढ झाली आहे. सुमारे 25 टक्के किशोरवयीन भारतीय या आजाराच्या विळख्यात आले आहेत. आगामी काळात वाढती स्पर्धा, बेरोजगारी, शिक्षणासाठी सुरू असलेली चढाओढ यामुळे हा आजार 2020 पर्यंत आणखी बळावण्याची भीती जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे. विशेषत: तरुणी व महिलांमध्ये हा आजार वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या आजाराबद्दल व त्यावर मात करण्यासाठी असलेल्या उपायांबद्दल जाणून घेऊयात... 🤔 ''एन्ग्झायटी डिप्रेशन' म्हणजे काय? : प्रत्येकाच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्न सुरू असतात. अशात जरा काही बिघडले की मन अस्वस्थ होते. एका मर्यादेपलीकडे गेलेली ही अस्वस्थता व अपेक्षापूर्ती न झाल्याने त्यानंतर येणारे नैराश्य यालाच आपण ''एन्ग्झायटी डिप्रेशन' म्हणू शकतो. 🎯 आजाराची लक्षणे काय? या आजारामुळे शरीरात व मानसिक रचनेत बरेच बदल होतात. हा पूर्णपणे बरा होणा