डाव्या कुशीवर झोपण्याचे फायदे

☑ डाव्या कुशीवर झोपल्यामुळे आपल्या हृदयावर दबाव जाणवत नसल्याने हृदय योग्य पद्धतीने काम करतं. यामुळे हृदयाचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.

☑ डाव्या कुशीवर झोपल्यामुळे शरीरातील विभिन्न अंग आणि मेंदूपर्यंत रक्तात ऑक्सिजनचा प्रवाह सुरळीत होतो. याने शरीराचे सर्व अंग निरोगी राहतात आणि चांगल्या प्रकारे कार्य करतात.

☑ डाव्या कुशीवर झोपल्यामुळे गर्भवती स्त्रियांसाठी डाव्या कुशीवर झोपणे योग्य आहे कारण याने गर्भात वाढत असलेल्या बाळाच्या प्रकृतीवर विपरित परिणाम होत नाही. याव्यतिरिक्त टाचा, हाता आणि पायांमध्ये सूज येण्याची समस्या दूर होते.

☑ डाव्या कुशीवर झोपल्यामुळे रक्त प्रवाह सुरळीत होत असल्याने झोप पूर्ण होते. या स्थितीत झोपून उठल्यावर थकवा जाणवत नाही आणि पोटासंबंधी समस्याही दूर होतात.

☑ पचन क्रिया सुरळीत होते आणि पाचक प्रणालीवर अतिरिक्त दबाव येत नाही. डाव्या बाजूकडे झोपल्याने शरीरात जमा होत असलेले टॉक्सिन लसिका वाहिनी तंत्राद्वारे बाहेर पडतात.

☑ बद्धकोष्ठतेची तक्रार असलेल्यांनी डाव्या कुशीवर झोपायला हवे. आराम मिळेल. गुरुत्वाकर्षणामुळे अन्न लहान आतड्यातून मोठ्या आतड्यात पद्धतशीर ढकलले जाते आणि सकाळी सहजपणे पोट स्वच्छ होतं.

☑ पोटातील अॅसिड वर न जाता खाली येतं, ज्याने अॅसिडिटी आणि छातीत जळजळणे अश्या समस्या दूर होतात.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाढदिवस आभार

वाढदिवस शुभेच्छा (Birthday Wishesh)

वायरमन - एक संघर्ष कथा