तुम्हाला ऊर्जा देतील असे काही विचार
👉 सगळ्यांकडेच वेळ असतो : आजकाल सर्वांचा हाच प्रॉब्लेम आहे कि, 'माझ्यासाठी कोणाला वेळच नाही?' 'माझ्याकडे कोणाचं लक्षच नाही' अशी ओरड ऐक्याला मिळते. पण यामागचे खरं कारण असते कि त्या संबंधित व्यक्तीला तुमच्यामध्ये इंटरेस्ट नसतो. मग अशा माणसांना तुमच्या आयुष्यात किती महत्व द्यायचं ते तुम्ही ठरवायचं. ज्यांना तुमच्या लेखी किंमत आहे अशी माणसे शोधा म्हणजे झालं.
👉 स्वार्थाशिवाय कामचं होत नाही : प्रत्येक जण हा स्वार्थ पाहत असतो, अगदी तुमचे प्रियजण सुद्धा. तुमचे मित्र पण काहीवेळा काम झाल्यावर ओळख देत नाहीत. म्हणून निर्णय तुमच्या हातात आहे कि, तुमचा वापर स्वार्थासाठी होऊ द्यायचा कि नाही?. कारण मदत आणि स्वार्थ या दोघांमध्ये फरक असतो हे नेहमी लक्षात ठेवा.
👉 सगळ्यांनाच खुश ठेवलं पाहिजे का? : आपल्या दैनंदिन आयुष्यात अशा अनेक गोष्टी असतात त्यांचा निर्णय आपल्या मनाविरुद्ध घ्यावा लागतो. अगदी एखादा प्लॅन केला असेल तर तो ऐनवेळी कॅन्सल करावा लागतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या प्रियजणांना सर्वांनाच खुश ठेऊ शकत नाहीत. कुणाला ना कुणाला दुखवावं लागतंच हे डोक्यात ठेवा.
👉 फुकटची अपेक्षा बाळगू नका : या जगात कोणतीही गोष्ट मिळवायची असेल तर त्यासाठी मोबदला चुकवावाच लागतो. तुमच्याकडे भरपूर गुण असले तरी त्याला तुम्ही आकार देत नाहीत आणि ते जगासमोर आणत नाहीत तो पर्यंत त्याची किंमत नसते. यासाठीही तुम्हाला मोबदला द्यावाच लागतो. नसेल तर रडत बसण्यापेक्षा प्रयत्न करा.
👉 बहाणेबाजी सोडा : प्रत्येक जण काहींना काही कारणाने रडगाणे गात असतो. जसं की, माझ्याकडे गाडी नाही, बंगला नाही. पण खरं तर हे आपले बहाणे असतात. प्रत्येक गोष्ट तुमची होऊ शकते जर तुम्ही प्रयत्न केले तर. त्यामुळे बहाणे करू नका अडचणींवर मात करा.
👉 फक्त स्वप्न पाहू नका : तुम्ही स्वप्ने बघताय हि मोठी गोष्ट आहे. तुम्ही स्वप्ने पहा कारण ते तुम्हाला यशस्वी होण्यासाठी मदत करतात. पण नुसते स्वप्न पाहून तुम्ही यशस्वी व्हाल का? नाही. म्हणून यशस्वी होण्यासाठी स्वप्नांसोबत कृती करणे देखील तेवढेच महत्वाचं आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा