'एन्ग्झायटी डिप्रेशन' लक्षणे आणि उपाय

जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या एका आकडेवारीनुसार 2020 पर्यंत 'एन्ग्झायटी डिप्रेशन' हा जगातील दुसरा मोठा आजार ठरणार आहेत. गेल्या दशकाच्या तुलनेत या आजारात आता 18 टक्क्यांची वाढ झाली आहे. सुमारे 25 टक्के किशोरवयीन भारतीय या आजाराच्या विळख्यात आले आहेत. 

आगामी काळात वाढती स्पर्धा, बेरोजगारी, शिक्षणासाठी सुरू असलेली चढाओढ यामुळे हा आजार 2020 पर्यंत आणखी बळावण्याची भीती जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे. विशेषत: तरुणी व महिलांमध्ये हा आजार वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या आजाराबद्दल व त्यावर मात करण्यासाठी असलेल्या उपायांबद्दल जाणून घेऊयात... 

🤔 ''एन्ग्झायटी डिप्रेशन' म्हणजे काय? : प्रत्येकाच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्न सुरू असतात. अशात जरा काही बिघडले की मन अस्वस्थ होते. एका मर्यादेपलीकडे गेलेली ही अस्वस्थता व अपेक्षापूर्ती न झाल्याने त्यानंतर येणारे नैराश्य यालाच आपण ''एन्ग्झायटी डिप्रेशन' म्हणू शकतो.

🎯 आजाराची लक्षणे काय?

या आजारामुळे शरीरात व मानसिक रचनेत बरेच बदल होतात. हा पूर्णपणे बरा होणारा आजार असून त्याची लक्षणे आता पाहूयात .

▪  झोप व्यवस्थित न लागणे.
▪  रात्ररात्रभर बेचैन असणे.
▪ भूक लागण्याचे प्रमाण कमी होत जाणे.
▪  सातत्याने बेचैन वाटते. हातापायांना सतत घाम येणे.
▪  आत्मविश्वास कमी होत जाणे.
▪  थकवा व सुस्ती जाणवत राहणे.
▪  एकाग्रतेत कमी येणे.

 🎯 आजारावरील उपाय काय?

'एन्ग्झायटी डिप्रेशन'पासून स्वत:ची सुटका करून घेणे शक्य आहे. आता जाणून घेऊया त्यावरील उपाय काय आहेत.

▪ प्रथमतः मनमोकळे बोला.
▪ नियमित व्यायाम करा.
▪ तुमच्यातील सुप्त कलेला वाव द्या. 
▪ नकारात्मकतेपासून दूर रहा.
▪ आपल्या कामाची, परिस्थितीची समीक्षा करा
▪ नुसताच विचार करीत रात्ररात्र जागू नका.
▪ निसर्गोपचाराचाही विचार करा.
▪ विशेष म्हणजे चुकांवर रडत बसू नका.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाढदिवस आभार

वाढदिवस शुभेच्छा (Birthday Wishesh)

वायरमन - एक संघर्ष कथा