आर्थिक चुका टाळायच्या काही पद्धती
दिसेंदिवस महागाई वाढत आहे. त्यामुळे पैशाचे नियोजन करणे कठीण होऊन बसलंय. अशात आपणच केलेल्या काही आर्थिक चूका उदा. नको तेवढा खर्च करणे वा कर्ज काढणे इ. आपणांस खूप वेळा अडचणीत आणतात. म्हणून आपल्याकडून होणाऱ्या 'या' आर्थिक चुका टाळण्यासाठी पुढील गोष्टी ट्राय करायला हरकत नाही.
1) सर्वात प्रथम उगाचच किरकोळ गोष्टींवर खर्च करणे बंद करा. जसं की, ’फर्स्ट डे फर्स्ट शो’ सिनेमा पाहणे किंवा घरूनच जेवणाची ऑर्डर देणे इ. हे खर्च सुरूवातीस छोटे-छोटे वाटत असतात परंतू कालांतराने ही सवय तुम्हाला तुमच्या मिळकतीपेक्षा जास्त खर्च करावयास शिकवते. यावर जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक म्हणजे वॉरन बफेंनी दिलेला सल्ला असा की, मिळकतीतील काही टक्के रक्कम जरूर सेव्हींग करा.
2) महिन्याच्या किंवा वर्षांच्या सुरूवातीस भविष्यात होणाऱ्या खर्चाची यादी आणि त्यासाठी करावी लागणारी जुळणी याचे सारासार प्लॅनिंग करा. महत्वाचं म्हणजे त्या प्लॅनिंगमध्ये सेव्हींगचा देखील विचार करा.
3) प्लॅस्टीक मनी (क्रेडीट/डेबीट कार्ड इ.) ची सूविधा चांगली आहे. परंतू आपण वेळोवेळी क्रेडीट कार्डचा रिपोर्ट बघणे अत्यंत जरूरी आहे. वेळीच रिपोर्टचा अभ्यास करा आणि पहा तुम्ही स्टेटसच्या नावावर अविचारी वापर केला आहे का नाही?
4) 'लवकरच पैसे मिळणार आहेत', 'वस्तू स्वस्त आहे' म्हणून किंवा या-ना त्या कारणांमूळे आपण कर्जावर वस्तू घेत असाल ते थांबवा. आपली ही सवय आपल्याला पुढे जाऊन कर्जाच्या खाईत नेईल.
5) स्वप्नातील घर, गाडी घेण्याच्या नादात आपले महिन्याचे पैशाचे गणित बिघडवणे कधीही वाईट. लक्षात घ्या, मोठे घर, गाडी बरोबर इतर खर्चही तुमच्या पदरी पडतात. उदा. मेंटेनन्स, इंधन खर्च इ. तेव्हा इनव्हेंस्टमेंट करताना विचारपूर्वकच करा म्हणजे अडचणी येणार नाहीत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा