12 वी नंतरचे वैद्यकीय क्षेत्रातील करिअर ऑप्शन(Career options in medical after 12th)

1) शिक्षण - एमबीबीएस 
कालावधी - पाच वर्षे सहा महिने 
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र आणि सीईटी प्रवेश परीक्षा 
संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी
पुढील उच्च शिक्षण - एमडी, एमएस व इतर पदविका

2) शिक्षण - बीएएमएस 
कालावधी - पाच वर्षे सहा महिने 
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी 
संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी
पुढील उच्च शिक्षण - एमडी, एमएस व इतर पदविका

3) शिक्षण - बीएचएमएस 
कालावधी - पाच वर्षे सहा महिने 
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी 
संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी
पुढील उच्च शिक्षण - एमडी

4) शिक्षण - बीयूएमएस 
कालावधी - पाच वर्षे सहा महिने 
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी 
संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी
पुढील उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण

5) शिक्षण - बीडीएस 
कालावधी - चार वर्षे 
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी 
संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी
पुढील उच्च शिक्षण - एमडीएस

6) शिक्षण - बीएससी इन नर्सिंग 
कालावधी - चार वर्षे 
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र 
संधी कोठे? - रुग्णालयात नर्स म्हणून नोकरी 
पुढील उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण

7) शिक्षण - बीव्हीएससी अ‍ॅण्ड एएच 
कालावधी - पाच वर्षे 
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र 
संधी कोठे? - प्राणी, जनावर रुग्णालयात नोकरी, प्राणी संग्रहालय, अभयारण्यात नोकरी, स्वतःचा व्यवसाय 
पुढील उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण

8) शिक्षण - डिफार्म
कालावधी - तीन वर्षे 
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, थेट प्रवेश 
संधी कोठे? - औषधनिर्मिती कारखान्यात नोकरी, स्वतःचा व्यवसाय 
पुढील उच्च शिक्षण - बीफार्म

9) शिक्षण - बीफार्म 
कालावधी - चार वर्षे 
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी 
संधी कोठे? - औषध कंपनी किंवा औषध संशोधन संस्था इत्यादी ठिकाणी नोकरी, स्वतःचा व्यवसाय, नागरी सेवा परीक्षा 
पुढील उच्च शिक्षण - एमफार्म

10) संरक्षण दलांत प्रवेशासाठी 
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (यूपीएससी) वर्षातून एनडीए (एक) व एनडीए (दोन) अशा दोन वेळा लेखी परीक्षा होतात. एअर फोर्स व नेव्हीसाठी जे उमेदवार राज्य शिक्षण मंडळाची किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची बारावी परीक्षा भौतिकशास्त्र व गणित या विषयांसह उत्तीर्ण आहेत किंवा त्या परीक्षेस बसलेले आहेत, असे उमेदवार परीक्षेसाठी पात्र ठरतात. वयोमर्यादा : साडेसोळा ते 19 वर्षांदरम्यान वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाढदिवस आभार

महाराष्ट्रातील बस स्टैंड चे फोन नंबर(Bus Stand Phone Numbers Of MSRTC)

बायकोस वाढदिवस शुभेच्छा (वाढदिवस शुभेच्छा बायको)