स्वतःला मोटिव्हेट करण्यासाठी काही खास टिप्स
▪ प्रायोरिटी
आयुष्यात कोणत्याही बाबतीत तुमची प्रायोरिटी नेमकी कशाला आहे हे नक्की करा, यामुळे जवळपास निम्म्या गोष्टी सोप्या होऊन जातात.
▪ मर्यादा आखून घ्या
एखाद्या गोष्टीसाठी आपण कुठपर्यंत आणि किती काम करायचे हे ठरवून घ्या. प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते आणि ती असू द्या, कारण वेळेला खूप महत्व असते.
▪ स्मार्टवर्क करा
कष्ट केले कि फळ मिळते हे अर्थात बरोबर आहेच, पण आता हार्डवर्कला स्मार्टवर्कची जोड देणे हे खूप महत्वाचे झाले आहे. धावत्या जगाशी बरोबरी साधायची असेल तर हे स्मार्टवर्क तुम्हाला अवगत करून घ्यावे लागेल.
▪ पुरेशी झोप घ्या
प्रत्येकाला काम करायचं असतं, मग कोणी गृहिणी असो, व्यवसाय करणारा असो किंवा नोकरी करणारा, प्रत्येकाला काम करणे भाग आहे. पण या कामाच्या व्यापात आपली पुरेशी झोप होणे हे फार गरजेचे आहे, कारण आपली तब्येत ठीक असेल तर आपण काम करू शकणार आहोत.
▪ रुटीन
दिवसभराचं असेल किंवा आठवड्याभराचं असेल, तुमच्या कामाचं रुटीन ठरवून घ्या. रुटीन ठरवून घेतले तर तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढायला संधी मिळेल. कामासोबत आपल्या स्वतःसाठीचा वेळ हा फार महत्वाचा असतो.
▪ नाही' म्हणायला शिका
बऱ्याच जणांना "समोरच्याला 'नाही' कसे म्हणायचे", हा विचार येऊन, समोरच्याच्या हो ला हो करत असतात. असे केल्याने नंतर आपल्यालाच त्रास होतो, त्यामुळे एखादी गोष्ट पटत नसेल, जमत नसेल तर लगेच तिथल्या तिथे स्पष्ट सांगायला शिका, तुमच्यासाठी सोपे होईल.
▪ शिस्त महत्वाची
आपल्या सगळ्या गोष्टींना एक शिस्त खूप महत्वाची असते. आपले कामं असतील किंवा वैयक्तिक काही गोष्टी असतील यात जर शिस्त दिसली तर ऑफिसमधल्या लोकांना किंवा जवळच्या माणसांना तुमचा हेवा नक्कीच वाटेल, कारण आजच्या काळात शिस्त ही खूप अवघड आणि तितकीच महत्वाची गोष्ट आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा