मूगडाळ खाण्याचे फायदे

आपल्या आहारात विविध डाळींचा समावेश असतो. मात्र यात विशेषतः मूगडाळीचा समावेश असेल तर तुमच्यासाठी ते नक्कीच फायदेशीर ठरेल. चला तर आज मूगडाळीचे फायदे जाणून घेऊयात... 

▪ चेहर्‍यावरील डाग हटवण्यापासून ते अगदी डोळ्यांखालील काळी वर्तुळं कमी करण्यासाठी मूग डाळ फायदेशीर आहे. 

▪ मूगडाळीमध्ये व्हिटॅमिन आणि फॉस्फरस घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे चेहर्‍यावरील सुरकुत्या तसेच नैसर्गिकरित्या चेहर्‍यावरील डाग कमी होतात.

▪ मूगडाळीमुळे मेंदूमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यास मदत होते. केसांना समूळ मजबुतपणा येण्यास मदत होते. 

▪ मूग पचायला हलका आहे. त्यामधील फायबर घटक पचनक्रिया सुरळीत करण्यास मदत होते. पोटात गॅस जमा होण्याचं प्रमाण नियंत्रणात राहते. 

▪ मूग भूकेवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. यामुळे वजन घटवण्याचा प्रयत्न करणार्‍यांनी मधल्या वेळेत लागणार्‍या भूकेवर नियंत्रण ठेवण्यासाठी मूग खाणं फायदेशीर आहे.

▪ मूग खाल्ल्याने रक्तदाबाचा त्रासही आटोक्यात राहतो. यामुळे रक्तातील मॅग्नेशियमचा प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाढदिवस आभार

वाढदिवस शुभेच्छा (Birthday Wishesh)

बायकोस वाढदिवस शुभेच्छा (वाढदिवस शुभेच्छा बायको)