पोस्ट्स

मार्च, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मूगडाळ खाण्याचे फायदे

आपल्या आहारात विविध डाळींचा समावेश असतो. मात्र यात विशेषतः मूगडाळीचा समावेश असेल तर तुमच्यासाठी ते नक्कीच फायदेशीर ठरेल. चला तर आज मूगडाळीचे फायदे जाणून घेऊयात...  ▪ चेहर्‍यावरील डाग हटवण्यापासून ते अगदी डोळ्यांखालील काळी वर्तुळं कमी करण्यासाठी मूग डाळ फायदेशीर आहे.  ▪ मूगडाळीमध्ये व्हिटॅमिन आणि फॉस्फरस घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे चेहर्‍यावरील सुरकुत्या तसेच नैसर्गिकरित्या चेहर्‍यावरील डाग कमी होतात. ▪ मूगडाळीमुळे मेंदूमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यास मदत होते. केसांना समूळ मजबुतपणा येण्यास मदत होते.  ▪ मूग पचायला हलका आहे. त्यामधील फायबर घटक पचनक्रिया सुरळीत करण्यास मदत होते. पोटात गॅस जमा होण्याचं प्रमाण नियंत्रणात राहते.  ▪ मूग भूकेवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. यामुळे वजन घटवण्याचा प्रयत्न करणार्‍यांनी मधल्या वेळेत लागणार्‍या भूकेवर नियंत्रण ठेवण्यासाठी मूग खाणं फायदेशीर आहे. ▪ मूग खाल्ल्याने रक्तदाबाचा त्रासही आटोक्यात राहतो. यामुळे रक्तातील मॅग्नेशियमचा प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

स्वतःला मोटिव्हेट करण्यासाठी काही खास टिप्स

▪ प्रायोरिटी आयुष्यात कोणत्याही बाबतीत तुमची प्रायोरिटी नेमकी कशाला आहे हे नक्की करा, यामुळे जवळपास निम्म्या गोष्टी सोप्या होऊन जातात. ▪ मर्यादा आखून घ्या एखाद्या गोष्टीसाठी आपण कुठपर्यंत आणि किती काम करायचे हे ठरवून घ्या. प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते आणि ती असू द्या, कारण वेळेला खूप महत्व असते. ▪ स्मार्टवर्क करा कष्ट केले कि फळ मिळते हे अर्थात बरोबर आहेच, पण आता हार्डवर्कला स्मार्टवर्कची जोड देणे हे खूप महत्वाचे झाले आहे. धावत्या जगाशी बरोबरी साधायची असेल तर हे स्मार्टवर्क तुम्हाला अवगत करून घ्यावे लागेल. ▪ पुरेशी झोप घ्या प्रत्येकाला काम करायचं असतं, मग कोणी गृहिणी असो, व्यवसाय करणारा असो किंवा नोकरी करणारा, प्रत्येकाला काम करणे भाग आहे. पण या कामाच्या व्यापात आपली पुरेशी झोप होणे हे फार गरजेचे आहे, कारण आपली तब्येत ठीक असेल तर आपण काम करू शकणार आहोत. ▪ रुटीन दिवसभराचं असेल किंवा आठवड्याभराचं असेल, तुमच्या कामाचं रुटीन ठरवून घ्या. रुटीन ठरवून घेतले तर तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढायला संधी मिळेल. कामासोबत आपल्या स्वतःसाठीचा वेळ हा फार महत्वाचा असतो. ▪ नाही' म्हणायल

जीवन जगण्याचे तत्व ९०/१०

आपलं मानस शास्त्र वरून अज्ञात लेखकाचा वाचनीय लेख....... 😇९०/१० तत्व फक्त १०% जीवन हे आपल्या सोबत काय घडलंय यावर आहे, आणि ९०% जीवन हे त्यावरील आपल्या प्रतिक्रियावर अवलंबूनअसतं. जे घडतंय त्या १०% वर आपला काहीही ताबा नसतो. उदा. गाडी बंद पडणे, ट्रेन, विमान, बसला उशीर होणे, मुलांना यायला उशीर होणे, अचानक काहीतरी घडणे, आधीच उशीर झालाय आणि आपण जाण्या आधीच लाल सिग्नल पडणे वगैरे वगैरे. या १०% गोष्टींसाठी आपण काहीही करू शकत नाही. पण आपण त्यावर कसे वागतो यावर पुढचं ९०% अवलंबून असतं. उदाहरण द्यायचे तर, तुम्ही कामावर जाण्यासाठी पेहराव करून बसलात आणि चहा देण्यासाठी कन्या आतून आली, तिला ठेच लागली आणि कपातला चहा तुमच्या शर्टावर सांडला......    हे फक्त १०% झालं,मात्र यावर तुमची प्रतिक्रिया काय असेल यावर पुढचं ९०% रामायण अवलंबून असतं. तुम्ही चिडलात, तिला ओरडलात, ती दुःखी झाली, रडायला लागली. आता तुम्ही तुमचा मोर्चा पत्नीकडे वळवलात, "हे सगळं तुझ्या लाडामुळे झालंय, मुलांना अजिबात वळण लावलं नाहीस" असं म्हणून पत्नीलाही ओरडलात. तसंच घसरणारा ट्रे विकत आणतांना लक्ष दिलं नाही म्हणून तिला ऐ