वायरमन - एक संघर्ष कथा
वायरमन
नाव ऐकल्यावर असे वाटायचे की मी पण वायरमन झालो पाहिजे मला पण वायरमनची नोकरी करायला पाहिजे किती मस्त जीवन असते वायरमनचे सकाळी कामावर जायचे ड्युटी करायची कोणाच्या घराची लाईन बंद असेल तर चालु करायची फ्युज गेला असेल तर तो टाकुन लाईन चालु करायची मग संध्याकाळ झाली का ड्युटी संपल्यावर घरी जायचे आणि आपल्या परिवाराला वेळ द्यायचा छान जिवन जगायचे पब्लिक पण आपल्याला मानसन्मान देतील आपलापण एक वेगळाच रुबाब असेल आपलापण कोणालातरी धाक असेल अस सगळ मनात वायरमनचे चित्र होते.
मग मी पण आयटीआय केला अप्रेंटीस केली आणि आपल्या कामधंद्याला लागलो प्रायवेट वायरमनचे कामसुरु केले नविन नविन खुप त्रास झाला आणि एकदाची सवय झाली रुटीन तस व्यवस्थित चालु होते नंतर महावितरण ची जाहिरात आली ज्युनियर टेक्निशियनची मला वाटल पोस्ट चांगली इम्प्रेसिव आहे मग मनात पुन्हा वायरमनचे चित्र तयार झाले व त्याविषयी कल्पना पुन्हा मनात पहिल्या सारख्या आठवल्या परिक्षा पास झालो आणि नौकरीवर रुजु झालो कार्यालयात रुजु झालो नविन नविन कोणी जास्त काम लावत न होत किरकोळ काम सांगण्यात येत होते दिवसा मागुन दिवस जात होते हळु हळु काम समजायला लागले नंतर मला गाव सांबाळायला देण्यात तसे जुने लाईनमन होते मदतीला त्यांनी आधी गावातली माहिती दिली लाईनी बद्दल सांगितले.
मग थोड्या दिवसांनी त्यांनी पण एकटे सोडले व पुर्ण गावातील लाईनीची जबाबदारी माझ्या कडे सोपवली यात दोन महिन्याचा कालावधी गेला. मी नविन असल्याने कोणा कडे माझा नंबर न होता त्यामुळे मला काही कोण्या ग्राहकाचे फोन येत नहोते मग माझ्या कडे थकबाकीची यादी सोपवण्यात आली वसुली करण्यास सांगितले माझ्या मनात पहिला प्रश्न आला की मी तर वायरमन म्हणुन लागलो आता लोकांच्या घरी बिल मागत फिरायची बिल मागितली तर लोकांचे अनेक प्रश्न मला बिल जास्त आले,रिडींग बरोबर घेत नाहीत,वेळेवर बिल मिळत नाही ,मला तर बिलच मिळाले नाही असे बरेच प्रश्न कसे तरी त्यांना उत्तर देत पहिल्यानदा वसुलीची यादी फिरवली त्यात काही लोक बरेवाइट बोलायचे तर काही लोक चक्क शिव्या द्यायचे. बिल जास्त पाठवता आणि आम्हाला सांगता बिल भरा तर कोणी म्हणत फुकटचा पगार घेताका वेळेवर बिल देत नाहि रिडींग बरोबर घेत नाहि असे बरेच टोमणे मारायचे पण मी कसतरी ती यादी फिरवुन घरी आलो डोक्यात फार गोंधळ चालु की मी नक्किच वायरमन आहेना कि यालोकांनच्या घराचा सालदार आणि हो वायरमन म्हणुन नेमक माझे काम कोणते हळुहळु याचीपण सवय झाली आणि आज एवढा बदीर झालो की कोणी किती बोलले तरी डोक शांत ठेवुन काम करतो कारण आता याची सवय झाली मित्र परिवार ,नाते वाईक सगळेच असे म्हणतात की तु आता पहिले सारखा राहिला नाहि नेहमी मजाक मस्ती करणारा बिंदास राहणारा आता तु खुप बदलला पहिले सारखा हसत बोलत नाही जास्त भेटत नाही.
आता त्यांना कोण सांगणार माझ्या मनातील व्यथा वायरमन चे पाहिलेले स्वप्न वास्तवात खुपच वेगळ निघाल ग्राहकांचे अनेक तक्रारी ,रिडींग घेणे ,वसुली करणे,1 1 kV ब्रेकडाऊन,मेंटेनंन्स,फ्युज कॉल,मिटर रिप्लेस,टिडी पिडी,इ. अजुन बरिच काम आणि त्यातल्यात्यात ग्राहकांचे बोलणे ऐका आपली चुकी नसतांना ,साहेबांचा दबाव ,दंडात्मक कार्यवाही ,निलंबन त्याचा धाक ऐवढा दबाव मनावर असतो की तो कोणाला सांगताही येत नाही ते म्हणतात ना "तोंडात बोळा आणि वरुन बुक्किचा मार" अशी परिस्थिती आमची आहे आज.
आम्ही वायरमन ऐवढ्या डिप्रेशन मधे जगतो आहे ते कोणाला सांगताही येत नाही. घरचे लोक म्हणतात तुम्ही वेळ देत नाही त्यांना ह्या आमच्या व्यथा कसे सांगणार आम्हि घरुन कामावर निघालो की परत घरी येणार की नाही याची ग्यारंटी नाही रोज मरणा सोबत खेळत जगतो आम्ही याची कोणाला परवा नाही.
फक्त लोकांना हेच वाटते की वायरमन म्हणजे एकदम सुखी मस्त पैकी पगार काम काहीच नाही पण त्यांना हे कुठे माहिती असते की तो रोज मरणा सोबत खेळतो वायरमनचे ही काही असतित्व असते एकदा वायरमनचे जिवन जगुन बघा तेव्हा कळेल वायरमन काय असते ते
हिच कहानी प्रत्येक वायरमनची आहे.
सलाम त्या वायरमनला तो न दिवसाची,न रात्रीची न ऊन वाराची,न पावसाची कसलीच परवा न करता तुम्हाला तत्पर सेवा देण्यास सदैव तयार असतो. त्याची कदर करण्यास शिका शेतकरी शेतात बैला कडुन काम करुन घेतो आणि त्यांची जाणीव ठेऊन त्यांची कदर करतो पण इथे तातडीची सेवा देऊन सुद्धा वायरमनची कदर नसते शेवटी तोही हाडामासाचा बनला आहे त्याचा पण जीव आहे त्याला पण संवेदना आहेत भावना आहेत त्याची पण कदर करायला शिका.
काही चुकल असेल तर माफ करा भावनेच्याभरात काही चुकीचे लिहिले असेल तर माफ करा.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा