चष्म्याचा नंबर कमी करण्याचे आयुर्वेदिक उपाय
डिजिटल युगात टिव्ही, मोबाईल आणि कॉम्प्युटर समोर तासन्-तास घालवल्याने हल्ली कमी वयातच चष्मा लागण्याचे प्रमाण वाढले आहे. कित्येकांना हा चष्मा नको असतो. तुमचा हा प्रॉब्लेम दूर करण्यासाठी आयुर्वेदात अनेक उपाय आहेत ज्यामुळे दृष्टीमध्ये स्पष्टता येऊन चष्म्याचा नंबर कमी केला जाऊ शकतो. चला तर अशाच काही उपायांबाबत जाणून घेऊयात...
▪ जीरे आणि खडीसाखर एकत्र प्रमाणात घेऊन वाटा. हे मिश्रण दररोज एक चमचा तुपासोबत घ्या.
▪ दररोज रात्री झोपण्यापूर्वी तिळाच्या तेलाने पायांना मसाज करा.
▪ दररोज ग्रीन टीचे सेवन करा. यातील अँटीऑक्सिडंटस् डोळ्यांना निरोगी राखण्यास मदत करतात.
▪ रात्री त्रिफळा पाण्यात भिजवून सकाळी त्या पाण्याने डोळे धुवा.
▪ रोज रात्री 6-7 बदाम भिजत घाला आणि सकाळी ते खा.
▪ 3-4 हिरव्या वेलची एक चमचा बडिशेपसोबत वाटा. हे मिश्रण एक ग्लास दुधासोबत घ्या.
▪ गाजराचा ज्यूस नियमित प्यायल्याने डोळ्यांची दृष्टी सुधारते.
▪ एक चमचा बडिशेप, 2 बदाम आणि अर्धा चमचा खडीसाखर एकत्र करुन बारीक पूड करा. रात्री झोपण्याआधी एक ग्लास दुधात हे मिश्रण टाकून प्या.
▪ रोजच्या जेवणात नियमितपणे हिरव्या भाज्यांचा समावेश करा. यातील अँटीऑक्सिडंटस् डोळ्यांचे आरोग्य निरोगी राखतात.
▪ डोळ्यांच्या चारही बाजूंना अक्रोडच्या तेलाने मसाज करा. यामुळे फायदा होईल.
वरील उपायांद्वारे तुमच्या चष्म्याचा नंबर नक्कीच कमी होऊ शकतो. विशेष म्हणजे हे आयुर्वेदिक उपाय असल्याने तुम्हाला कोणताही साईड इफेक्ट होणार नाही.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा