वायरमन - एक संघर्ष कथा
वायरमन नाव ऐकल्यावर असे वाटायचे की मी पण वायरमन झालो पाहिजे मला पण वायरमनची नोकरी करायला पाहिजे किती मस्त जीवन असते वायरमनचे सकाळी कामावर जायचे ड्युटी करायची कोणाच्या घराची लाईन बंद असेल तर चालु करायची फ्युज गेला असेल तर तो टाकुन लाईन चालु करायची मग संध्याकाळ झाली का ड्युटी संपल्यावर घरी जायचे आणि आपल्या परिवाराला वेळ द्यायचा छान जिवन जगायचे पब्लिक पण आपल्याला मानसन्मान देतील आपलापण एक वेगळाच रुबाब असेल आपलापण कोणालातरी धाक असेल अस सगळ मनात वायरमनचे चित्र होते. मग मी पण आयटीआय केला अप्रेंटीस केली आणि आपल्या कामधंद्याला लागलो प्रायवेट वायरमनचे कामसुरु केले नविन नविन खुप त्रास झाला आणि एकदाची सवय झाली रुटीन तस व्यवस्थित चालु होते नंतर महावितरण ची जाहिरात आली ज्युनियर टेक्निशियनची मला वाटल पोस्ट चांगली इम्प्रेसिव आहे मग मनात पुन्हा वायरमनचे चित्र तयार झाले व त्याविषयी कल्पना पुन्हा मनात पहिल्या सारख्या आठवल्या परिक्षा पास झालो आणि नौकरीवर रुजु झालो कार्यालयात रुजु झालो नविन नविन कोणी जास्त काम लावत न होत किरकोळ काम सांगण्यात येत होते दिवसा मागुन दिवस जात होते