पोस्ट्स

डिसेंबर, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

'एन्ग्झायटी डिप्रेशन' लक्षणे आणि उपाय

जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या एका आकडेवारीनुसार 2020 पर्यंत 'एन्ग्झायटी डिप्रेशन' हा जगातील दुसरा मोठा आजार ठरणार आहेत. गेल्या दशकाच्या तुलनेत या आजारात आता 18 टक्क्यांची वाढ झाली आहे. सुमारे 25 टक्के किशोरवयीन भारतीय या आजाराच्या विळख्यात आले आहेत.  आगामी काळात वाढती स्पर्धा, बेरोजगारी, शिक्षणासाठी सुरू असलेली चढाओढ यामुळे हा आजार 2020 पर्यंत आणखी बळावण्याची भीती जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे. विशेषत: तरुणी व महिलांमध्ये हा आजार वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या आजाराबद्दल व त्यावर मात करण्यासाठी असलेल्या उपायांबद्दल जाणून घेऊयात...  🤔 ''एन्ग्झायटी डिप्रेशन' म्हणजे काय? : प्रत्येकाच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्न सुरू असतात. अशात जरा काही बिघडले की मन अस्वस्थ होते. एका मर्यादेपलीकडे गेलेली ही अस्वस्थता व अपेक्षापूर्ती न झाल्याने त्यानंतर येणारे नैराश्य यालाच आपण ''एन्ग्झायटी डिप्रेशन' म्हणू शकतो. 🎯 आजाराची लक्षणे काय? या आजारामुळे शरीरात व मानसिक रचनेत बरेच बदल होतात. हा पूर्णपणे बरा होणा

आर्थिक चुका टाळायच्या काही पद्धती

दिसेंदिवस महागाई वाढत आहे. त्यामुळे पैशाचे नियोजन करणे कठीण होऊन बसलंय. अशात आपणच केलेल्या काही आर्थिक चूका उदा. नको तेवढा खर्च करणे वा कर्ज काढणे इ. आपणांस खूप वेळा अडचणीत आणतात. म्हणून आपल्याकडून होणाऱ्या 'या' आर्थिक चुका टाळण्यासाठी पुढील गोष्टी ट्राय करायला हरकत नाही.   1) सर्वात प्रथम उगाचच किरकोळ गोष्टींवर खर्च करणे बंद करा. जसं की, ’फर्स्ट डे फर्स्ट शो’ सिनेमा पाहणे किंवा घरूनच जेवणाची ऑर्डर देणे इ. हे खर्च सुरूवातीस छोटे-छोटे वाटत असतात परंतू कालांतराने ही सवय तुम्हाला तुमच्या मिळकतीपेक्षा जास्त खर्च करावयास शिकवते. यावर जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक म्हणजे वॉरन बफेंनी दिलेला सल्ला असा की, मिळकतीतील काही टक्के रक्कम जरूर सेव्हींग करा. 2) महिन्याच्या किंवा वर्षांच्या सुरूवातीस भविष्यात होणाऱ्या खर्चाची यादी आणि त्यासाठी करावी लागणारी जुळणी याचे सारासार प्लॅनिंग करा. महत्वाचं म्हणजे त्या प्लॅनिंगमध्ये सेव्हींगचा देखील विचार करा. 3) प्लॅस्टीक मनी (क्रेडीट/डेबीट कार्ड इ.) ची सूविधा चांगली आहे. परंतू आपण वेळोवेळी क्रेडीट कार्डचा रिपोर्ट बघणे अत्यंत जरूरी आहे. वेळीच र