पोस्ट्स

आरती संग्रह

              ॥ गणपती बाप्पा मोरया ॥ आरत्या - .............................................. ..... श्री गणपतीची आरती सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची | नुरवी पुरवी प्रेम कृपा जायची | सर्वांग सुंदर उटी शेंदुराची | कंठी झळके माळ मुक्ताफळाची | जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती | दर्शनमात्रे मन:कामना पुरती जय देव जय देव || धृ || रत्नखचित फार तुज गौरीकुमरा | चान्दांची उटी कुंकुमकेशरा | हिरेजडीत मुगुट शोभती बरा | रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया || जय || २ || लंबोदर पितांबर फणीवरबंधना | सरळ तोंड वक्रतुंड त्रिनयना | दास रामाचा वाट पाहे सदना | संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना | जयदेव जयदेव जय मंगलमुर्ती | दर्शनमात्रे मन:कामना पुरती || ३ || ................................................... श्री गणपतीची आरती शेंदूर लाल चढायो अच्छा गज मुखको | दोंदिल लाल विराजे सुत गौरीहरको | हाथ लिये गुडलड्डू साई सुरवरको | महिमा काहे न जाय लागत हुं पदको || १ || जय जय जी गणराज विद्यासुखदाता | धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता || धृ || अष्टौ सिद्धी दासी संकटको बैरी | विघ्नविनाशक मंगल मुरत अधिकारी | कोटीसुरजप्रकाश ऐ

Self Improvement Tips (स्वतः मध्ये सुधारणा करण्यासाठी काही टिप्स

  1. ज्ञान घेण्यासाठी आणि ग्रो होण्यासाठी दररोज ऑडिओबुक समरी एकले पाहिजे. 2. आपली आवड कशात आहे ते शोधून त्यावर काम केले पाहिजे 3. ग्रो होण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची भीती वाटते. सर्वात आधी ती भीती काढून टाकणे आवश्यक आहे. 4. आपले कौशल्य नियमितपणे सुधारणे आवश्यक आहे. 5. दररोज लवकर उठणे महत्त्वाचे आहे. 6. आपल्या आरोग्यासाठी साप्ताहिक व्यायाम करणे गरजेचे आहे. 7. ध्येय निश्चित केले पाहिजे. 8. आपण कम्फर्ट झोनमधून पहिला बाहेर पडणे आवश्यक आहे. 9. ठरवलेले महत्त्वाचे काम सर्वात आधी पुर्ण केले पाहिजे. 10. प्रेरणादायी लोकांकडून शिकले पाहिजे आणि त्याना फॉलो केले पाहिजे. 11. चांगल्या सवयींसाठी वाईट सवयी सोडून दिले पाहिजे. 12. सकारात्मक माईंडसेट ठेवणे आवश्यक आहे. 13. मनःशांतीसाठी ध्यान करणे आवश्यक आहे. 14. कम्युनिकेशन स्किल शिकले पाहिजे. 15. आपल्या क्षेत्रातील जे तज्ञ(experts) आहेत. त्यांच्याशी आपला संपर्क असणे आवश्यक आहे. 16. वैयक्तिक ग्रो होण्यासाठी सातत्याने वचनबद्ध राहीले पाहिजे.

गवती चहा चे आरोग्यवर्धक फायदे

 1) आलं आणि गवती चहा घालून केलेला चहा अनेक छोट्या-मोठय़ा तक्रारींवरचा रामबाण उपाय आहे. 2) सर्दी, डोकेदुखी, अंगातली बारीक कणकण घालवण्यासाठी हा सर्वोत्तम उपाय म्हणावा लागेल. 3) गवती चहाला पातीचा चहा असेदेखील म्हणतात. याला एक विशिष्ट सुगंध असतो. घाम येऊन तापाचा निचरा होण्यासाठी गवती चहा विशेष गुणकारी आहे. 4) गवती चहा, सुंठ, मिरे आणि दालचिनी यांचा अष्टमांश काढा घेतल्याने सर्दी-पडसे, थंडी वाजून ताप येणे आदी विकार नाहीसे होतात. 5) तापात घाम येण्यासाठी गवती चहाचा वाफारा दिला जातो. हा वाफारा घेतल्यास ताप झटक्यात कमी होतो आणि अंगदुखी थांबते. 6) गवती चहापासून तेलही काढतात. हे तेल संधिवात आणि वाताने अंग दुखण्यावर अत्यंत गुणकारी आहे. हे दुखणे असणार्या व्यक्तींनी सकाळ-संध्याकाळ गवती चहाच्या तेलाने मालीश केल्यास संधिवात बरा होतो, अंगदुखी थांबते. 7) गवती चहा कॉलरावरचा प्रतिबंध करण्यासाठीदेखील वापरला जातो.”

महावितरण च्या विज बिल वरील आकारण्यात येणाऱ्या चार्जेस बद्दल माहिती

  स्थिर आकार : (fixed charges):- ग्राहकाने वापर केला असो अगर नसो प्रत्येक ग्राहकाला स्थिर आकार त्याच्या जोडणीच्या प्रकारानुसार द्यावाच लागतो. वीज कंपनीला वीजपुरवठा देण्यासाठी पायाभूत सुविधांवर येणा-या खर्चासाठी ही रक्कम आकारली जाते. विज आकार :- वीज आकार म्हणजे ग्राहकाने वापरलेल्या विजेची किंमत. ग्राहकाला वीज पुरविण्यासाठी जी वीज खरेदी किंवा उत्पन्न करावी लागते त्याची किंमत म्हणजे वीज आकार. सुरुवातीच्या युनिट्ससाठी विजेचा दर सर्वात कमी तर नंतरच्या युनिट्ससाठी तो वाढत जातो. परंतु ग्राहकाने हे लक्षात घेतले पाहिजे की प्रत्येक ग्राहकाची वीज आकारणी त्या त्या स्लॅबनुसारच केली जाते. जास्त युनिट्स वापरणा-या ग्राहकाला सर्वात जास्त दर सरसकट लावला जात नाही. इंधन अधिभार (fuel adjustment charges):- इंधनाच्या (उदा. कोळसा, तेल किंवा नसíगक वायू) खरेदीच्या दरामध्ये जर वाढ झाली तर याची तफावत भरून काढण्यासाठी वीज कंपनीला जो जास्त खर्च करावा लागतो तो इंधन अधिभाराच्या रूपात कंपनी ग्राहकाकडून वसूल करू शकते. या उलट जर या किमतीत घट झाली तर त्याचा परतावा (credit)) देखील कंपनीला ग्राहकांना द्यावा लागतो. यासाठी

मैदा आरोग्यासाठी खरंच चांगला आहे का?

जा ड व्यक्तींना ‘मैद्याचं पोतं’ असं चिडवलं जातं. मैदा खाल्ल्याने जाडी वाढते, पोट बिघडतं असा एक समज आहे. तो कितपत खरा आहे? मैदा आपल्या आरोग्यासाठी चांगला आहे का ? या सर्व प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरेल.  साधारणपणे समोसा – कचोरीपासून, स्ट्रीट फूड, बेक केलेले पदार्थ आणि मिष्टान्नात मैद्याचा वापर केला जातो. मैद्यापासून बनवलेल्या पदार्थांमुळे वजन वाढते, पोट बिघडतं, असा समज असल्यामुळे मैद्याचे पदार्थ शक्यतो टाळले जातात. मात्र, मैदा आपल्या आरोग्यासाठी चांगला असू शकतो का? तर होय, आज आम्ही तो कसा वापरावा हे सांगू, जेणेकरून तुमचे वजन वाढणार नाही आणि तुम्ही बर्‍याच स्वादिष्ट पदार्थांचा स्वाद घेऊ शकाल. मैद्याचे पीठ गव्हापासून बनविलेले असते. गव्हाला रिफाईंड करून त्याचे साल काढून पीठ बनवले जाते. नंतर बेंझॉयल पेरोक्साइड ब्लीच केले जाते, ज्यामुळे पांढरा रंग आणि पोत मिळतो. मैद्याचे पीठ दररोज खाणे हानिकारक असू शकते. ते खूपच बारीक असल्यामुळे पोटात चिकटते. यामुळे हे पीठ अनेक रोगांना कारणीभूत ठरू शकते. मात्र, कमी प्रमाणात मैदा वापरत असल्यास आपण त्याचा तोटा टाळू शकतो. आम्ही तुम्हाल

गुणकारी जिभेचा व्यायाम

दांत घासून झाल्यावर रोज किमान एकदा तरी म्हणा.  लाटानुप्रास ज्याला मराठी भाषेचा अभिमान आहे त्यांच्या साठी हा भाषालंकार अनुप्रास समुद्राच्या लाटांप्रमाणे येतो.. नरहरी नरपाळें भक्तपाळें भुपाळें प्रगट रुप विशाळें दाविलें लोकपाळें खवळत रिपुकाळें काळकाळें कळाळें तट तट तट स्तंभि व्यापिलें वन्हीजाळें।। झळझळीत झळाळीं ज्वाळलोळें झळाळी लळलळीत लळाळीं लाळ लाळित लाळी। लळलळीत लळाळीं लाळ लाळित लाळी हळहळीत हळाळीं गोळमाळा हळाळी कळकळीत कळाळीं व्योम पोळीत जाळीं।। कडकडित कडाडीं कडकडाटें कडाडीं घडघडित घडाडीं घडघडाटें घडाडीं तडतडित तडाडीं तडतडाटें तडाडीं धडधडित धडाडीं धडधडाटें धडाडीं।। भरभरित भरारी भर्भराटे भरारी थरथरित थरारी थर्रथराटे थरारी तरतरित तरारी तर्तराटे तरारी चर्चरित चरारी चर्चराटे चरारी।। रजनिचर विभांडी दो करें पोट फोडी। गडगडित गडाडी आंतडी सर्व काढी। न धरित जन मानें लोक गेलें निदानें। हरिजन भजनानें शांत केलें दयेनें।। न अडखळता मोठ्याने म्हणण्याचा प्रयत्न करून पहा😊😊 ..

निरोप संदेश

सप्रेम नमस्कार,  मी (नाव) दि.(बदली झाल्याचा दिनांक व दिवस) रोजी महावितरण कंपनीच्या अकोला परिमंडळ येथे बदली झाल्याने कल्याण परिमंडलातील कल्याण ग्रामीण विभाग, गोवेली शाखा मधून कार्यमुक्त झालो.दि.27/05/2017 पासून आजपर्यंत च्या सेवाकाळात कल्याण मधील,मिञमंडळी, सहकारी कर्मचारी ,वरिष्ठ अधिकारी,बाह्यस्ञोत कर्मचारी,ग्राहक   या सर्वांचे कामकाजात,सुखदुःखात  चांगले सहकार्य,प्रेम लाभले एवढ्या ४ वर्षाच्या काळात आपण बाहेरगावी राहत असल्याची कधीही पुसटशी जाणीवही झाली नाही. यापुढेही असेच,प्रेम,लोभ,स्नेह राहावा, ही अपेक्षा !  या कालावधीत माझ्याकडून  कळत नकळतपणे काही चुका झाल्या असतील तर मोठ्या मनाने माफ करावे. सहकार्याबद्दल धन्यवाद व्यक्त करित आपली रजा घेतो.!