गुणकारी जिभेचा व्यायाम

दांत घासून झाल्यावर रोज किमान एकदा तरी म्हणा. 


लाटानुप्रास


ज्याला मराठी भाषेचा अभिमान आहे त्यांच्या साठी हा भाषालंकार अनुप्रास समुद्राच्या लाटांप्रमाणे येतो..


नरहरी नरपाळें भक्तपाळें भुपाळें

प्रगट रुप विशाळें दाविलें लोकपाळें

खवळत रिपुकाळें काळकाळें कळाळें

तट तट तट स्तंभि व्यापिलें वन्हीजाळें।।


झळझळीत झळाळीं ज्वाळलोळें झळाळी

लळलळीत लळाळीं लाळ लाळित लाळी।


लळलळीत लळाळीं लाळ लाळित लाळी

हळहळीत हळाळीं गोळमाळा हळाळी

कळकळीत कळाळीं व्योम पोळीत जाळीं।।


कडकडित कडाडीं कडकडाटें कडाडीं

घडघडित घडाडीं घडघडाटें घडाडीं

तडतडित तडाडीं तडतडाटें तडाडीं

धडधडित धडाडीं धडधडाटें धडाडीं।।


भरभरित भरारी भर्भराटे भरारी

थरथरित थरारी थर्रथराटे थरारी

तरतरित तरारी तर्तराटे तरारी

चर्चरित चरारी चर्चराटे चरारी।।


रजनिचर विभांडी दो करें पोट फोडी।

गडगडित गडाडी आंतडी सर्व काढी।

न धरित जन मानें लोक गेलें निदानें।

हरिजन भजनानें शांत केलें दयेनें।।


न अडखळता मोठ्याने म्हणण्याचा प्रयत्न करून पहा😊😊 ..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाढदिवस आभार

वाढदिवस शुभेच्छा (Birthday Wishesh)

वायरमन - एक संघर्ष कथा