मैदा आरोग्यासाठी खरंच चांगला आहे का?
जा ड व्यक्तींना ‘मैद्याचं पोतं’ असं चिडवलं जातं. मैदा खाल्ल्याने जाडी वाढते, पोट बिघडतं असा एक समज आहे. तो कितपत खरा आहे? मैदा आपल्या आरोग्यासाठी चांगला आहे का ? या सर्व प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरेल. साधारणपणे समोसा – कचोरीपासून, स्ट्रीट फूड, बेक केलेले पदार्थ आणि मिष्टान्नात मैद्याचा वापर केला जातो. मैद्यापासून बनवलेल्या पदार्थांमुळे वजन वाढते, पोट बिघडतं, असा समज असल्यामुळे मैद्याचे पदार्थ शक्यतो टाळले जातात. मात्र, मैदा आपल्या आरोग्यासाठी चांगला असू शकतो का? तर होय, आज आम्ही तो कसा वापरावा हे सांगू, जेणेकरून तुमचे वजन वाढणार नाही आणि तुम्ही बर्याच स्वादिष्ट पदार्थांचा स्वाद घेऊ शकाल. मैद्याचे पीठ गव्हापासून बनविलेले असते. गव्हाला रिफाईंड करून त्याचे साल काढून पीठ बनवले जाते. नंतर बेंझॉयल पेरोक्साइड ब्लीच केले जाते, ज्यामुळे पांढरा रंग आणि पोत मिळतो. मैद्याचे पीठ दररोज खाणे हानिकारक असू शकते. ते खूपच बारीक असल्यामुळे पोटात चिकटते. यामुळे हे पीठ अनेक रोगांना कारणीभूत ठरू शकते. मात्र, कमी प्रमाणात मैदा वापरत असल्यास आपण त्याचा तोटा टाळू शकतो. आम्ही तुम्हाल