पोस्ट्स

मे, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

प्रकृतीचे तीन नियम

प्रकृतिचा  पहिला  नियम सुपीक शेतात बी पेरले नाहीतर निसर्ग अशी शेती घासगवताने भरून टाकतो. अगदी तसेच मानवी बुद्धीत सकारात्मक विचार  भरले नाही तर नकारात्मक विचार आपोआप तयार होतात. प्रकृतिचा दूसरा  नियम ज्याच्याकडे जे आहे तो त्याचेच वाटप करतो. सुखी सुख वाटतो. दुःखी दुःख वाटतो. ज्ञानी ज्ञान वाटतो. भ्रमित करणारा भ्रम वाटतो. घाबरणारा भय वाटतो. प्रकृतिचा तिसरा नियम आपल्याला आयुष्यात जे काही मिळाले ते पचवायला शिका. कारण भोजन जर पचले नाही तर रोग वाढतात. पैसा पचला नाही तर देखावा वाढतो. बातचित पचली नाही तर  चुगली वाढते. प्रशंसा पचली नाही तर अंहकार वाढतो. टिका पचली नाही तर दुश्मनी वाढते. गोपनीयता टिकली नाहीतर खतरा वाढतो. दुःख पचले नाहीतर निराशा वाढते. आणि सुख पचले नाही तर  पाप वाढते.

गुणकारी हळद

आयुर्वेदात हळदीला अमृत तुल्य औषधी मानण्यात आले आहे. सुंदरतेच्या बाबतीतही हळद गुणकारी आहे आणि सौंदर्याच्या अनेक समस्या दूर करण्यात सक्षमही आहे. हळदीच्या वापरामुळे जेवणात वापरण्यात येणाऱ्या अनेक घटकांना एकप्रकारचं संरक्षण प्राप्त होत असतं, कारण हळद ही जंतुनाशक आहे. 1) हळदीमध्ये करक्युमिन नावाचं रसायन औषध म्हणून काम करते. जे शरीरातील सूज कमी करण्यास मदतगार ठरते.  2) बुद्धी तल्लख ठेवण्यासाठी सकाळी गरम पाण्यात हळद टाकून प्यायला हवे.  3) हळदीत एक ताकदवान अँटीऑक्साइड असतात. जे कॅन्सरच्या कोशिकांशी टक्कर देतात.  4) हळदीचे पाणी प्यायल्याने रक्त गोठत नाही. तसेच रक्त साफ होण्यासही मदत होते.  5) हळदीत करक्युमिन असल्याने गुडघ्याचे दुखणे आणि सूज दूर करण्यात औषधापेक्षा अधिक काम करते.  6) हळदीचे पाणी नियमितपणे प्यायल्यास फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत होते. यामुळे तुमच्या शरीरावर हळूहळू परिणाम होतो.  7) एका रिसर्चनुसार, हळदीचे सेवन केल्याने ग्लुकोजची लेव्हल कमी राहते. तसेच टाईप-2 च्या डायबिटीजचा धोकाही टळतो.  8) गरम पाण्यात लिंबू, हळद आणि मध टाकून प्यायला पाहिजे. हे पेय शरिरातील विषारी प