पोस्ट्स

जानेवारी, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Md India Policy Number (mediclaim) Mahavitaran

मेडिक्लेम पॉलिसी 2019 To 2020 सदर क्रमांक महावितरण चे कर्मचारी ज्यानी मेडिक्लेम मध्ये नोंदणी केलेली आहे त्यांच्या करीता आहे. खालील क्रमांक कॉपी करुण पॉलिसी नंबर च्या जागी पेस्ट करावा. नंतर भ.नि.नि क्रमांक टाकून आय कार्ड डाउनलोड करावेत. https://mdindiaonline.com/E-Cardrequest.aspx  दिलेल्या लिंकवर जावून खालील स्टेप कराव्यात... १) The oriental Insurance company Select करा... २) Customer type - Corporate select करा.. ३)  पॉलिसी नंबर     :-     163600/48/19/07956 ४) भ.नि.नि.क्र. टाका त्यानंतर आपल्या परिवारातील सर्व नावे दिसतील.ECard clickकरुण open करावे..ECard Print काढावे..

Marathi Quotes

1) मैत्रीचे धागे कोळ्यापेक्षाही बारीक असतात , पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात ....!! तुटले तर श्वासानेही तुटतील , नाहीतर वज्राघाेतानेही तुटणार नाहीत ....!! 2) संवाद दोनच माणसांचा होतो , त्यांच्यात तिसरा माणूस आला की त्या गप्पा होतात .... !!  3) कोमलतेत प्रचंड सामर्थ्य असतं .... !!  कोमलता म्हणजे दुर्बलता नव्हे .... !! म्हणूनच खडक झिजतात प्रवाह रुंदावत जातो .... !! 4) जाळायला काही नसलं तर पेटलेली   काडीसुद्धा आपोआप विझते .... !! 5) खर्च झाल्याचं दु:ख नसतं , हिशोब   लागला नाही की मग त्रास होतो .... !! 6) प्रॉब्लेम्स कुणाला नसतात ....? ते शेवटपर्यंत असतात .... !! पण प्रत्येक प्राॅब्लेमला उत्तर हे असतंच .... !! ते सोडवायला कधी वेळ हवा असतो ,  कधी पैसा तर कधी माणसं .... !! या तिन्ही गोष्टी पलीकडचा प्राॅब्लेम अस्तित्वातच नसतो .... !! 7) आठवणी या मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात .... !! वारूळ पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अदमास घेता येत नाही . पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एकामागोमाग असंख्य मुंग्या बाहेर पडतात . आठवणींचंही तसंच आहे .... !! 8) शस्त्रक्

जीवन कसे जगावे ?

कुणाला आपला कंटाळा येईल  इतकं जवळ जाऊ नये चांगुलपणाचे ओझे वाटेल इतके चांगले वागू नये... कुणाला गरज नसेल आपली तिथे रेंगाळत राहू नये... नशीबाने जुळलेली नाती जपावी  पण स्वतःहून तोडू नये... गोड बोलणे गोड वागणे कुणास अवघड वाटू नये... जवळपणाचे बंधन होईल इतके जवळचे होऊच नये... सहजच विसरून जावे सारे सल मनात जपू नये... नकोसे होऊ आपण इतके आयुष्य जगूच नये... हवे हवेसे असतो तेव्हाच पटकन दूर निघून जावे... आपले नाव दुस ऱ्याच्या ओठी राहील इतकेच करून जावे... *कारण* जीवनाच्या वाटेवर  साथ देतात, मात करतात, हात देतात, घात करतात, ती ही असतात..... माणसं ! संधी देतात, संधी साधतात, आदर करतात, भाव खातात ती ही असतात..... माणसं ! वेड लावतात,  वेडं ही करतात, घास भरवतात, घास हिरावतात ती ही असतात..... माणसं ! पाठीशी असतात,  पाठ फिरवतात, वाट दाखवतात ,  वाट लावतात ती ही असतात..... माणसं ! शब्द पाळतात,  शब्द फिरवतात, गळ्यात पडतात,  गळा कापतात ती ही असतात ...... माणसं ! दूर राहतात,  तरी जवळचीच वाटतात, जवळ राहून देखील,  परक्यासारखी वागतात ती ही असतात ..