तुम्हाला ऊर्जा देतील असे काही विचार
👉 सगळ्यांकडेच वेळ असतो : आजकाल सर्वांचा हाच प्रॉब्लेम आहे कि, 'माझ्यासाठी कोणाला वेळच नाही?' 'माझ्याकडे कोणाचं लक्षच नाही' अशी ओरड ऐक्याला मिळते. पण यामागचे खरं कारण असते कि त्या संबंधित व्यक्तीला तुमच्यामध्ये इंटरेस्ट नसतो. मग अशा माणसांना तुमच्या आयुष्यात किती महत्व द्यायचं ते तुम्ही ठरवायचं. ज्यांना तुमच्या लेखी किंमत आहे अशी माणसे शोधा म्हणजे झालं. 👉 स्वार्थाशिवाय कामचं होत नाही : प्रत्येक जण हा स्वार्थ पाहत असतो, अगदी तुमचे प्रियजण सुद्धा. तुमचे मित्र पण काहीवेळा काम झाल्यावर ओळख देत नाहीत. म्हणून निर्णय तुमच्या हातात आहे कि, तुमचा वापर स्वार्थासाठी होऊ द्यायचा कि नाही?. कारण मदत आणि स्वार्थ या दोघांमध्ये फरक असतो हे नेहमी लक्षात ठेवा. 👉 सगळ्यांनाच खुश ठेवलं पाहिजे का? : आपल्या दैनंदिन आयुष्यात अशा अनेक गोष्टी असतात त्यांचा निर्णय आपल्या मनाविरुद्ध घ्यावा लागतो. अगदी एखादा प्लॅन केला असेल तर तो ऐनवेळी कॅन्सल करावा लागतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या प्रियजणांना सर्वांनाच खुश ठेऊ शकत नाहीत. कुणाला ना कुणाला दुखवावं लागतंच हे डोक्यात ठेवा. 👉 फुकटची अपेक्षा