सुविचार संग्रह
1) Success & Excuses can never be Together. If You want Excuses, forget about Success. If You want Success , Do Not Give Excuses. 2) यशस्वी व्हायचे सगळ्यात सोपे उपाय. एका हातात "लोणी "घ्या व एका हातात "चुना"..... (दोन्हीही एक सारखेच दिसतात.) बस्स फक्त समोरच्याला वेळ काळ पाहून लावत रहा. 3) शर्यती मध्ये पाळणाऱ्या घोड्याला "विजय" काय असतो हे माहितीही नसतं... त्यावर बसलेल्या माणसाने दिलेल्या यातनांमुळे, तो जिवाच्या आकांताने पळत असतो... जेवढ्या यातना जास्त तेवढा घोड्याचा वेग जास्त... आणि विजय पक्का... त्याप्रमाणे तुमच्या जीवनात जेवढ्या अडचणी, आणि जेवढ्या यातना जास्त तेवढाच तुमचा विजय पक्का...! 4) गोड मध बनवणारी मधमाशी चावायला विसरत नाही... त्यासाठी सावधान रहा... कारण...जास्त गोड बोलणारी माणसे पण इजा पोहचवु शकतातं... गरजेच्या वेऴी सुकलेल्या ओठातुन नेहमीच गोड शब्द बाहेर पडतात.. पण एकदा का तहान भागली की मग " पाण्याची चव " आणि " माणसाची नियत " दोन्ही बदलतात.... जो पर्यत ठिक आहे . तो पर्यत देवाला दुरुनंच हात जोडतात ...