पैसा टिकत नाही म्हणजे एक्झॅक्टली काय ?
पैसा टिकत नाही म्हणजे एक्झॅक्टली काय ? "...काहीही करा साला, पैसा काय टिकत नाही यार" ही एक कॉमन तक्रार माझ्यासारख्यांना रोज ऐकावी लागते. धनप्राप्ती मजबूत प्रमाणात असूनदेखील हे रडगाणं का असतं? मी याचा जरा सखोलपणे विचार केला. आणि मला काही गोष्टी निदर्शनास आल्या. त्या म्हणजे १) अनावश्यकपणे वाढवलेलं Cost of living २) ते Cost of living तसंच Maintain करण्यासाठी घ्यावं लागणारं कर्ज ३) मुलांचे अनावश्यक लाड ४) गरज नसताना केलेल्या ऑनलाईन खरेद्या ५) महत्वाकांक्षापूर्ततेचा आंधळा अट्टहास ...ही त्यामागची पाच महत्वाची कारणे आहेत. आजारपण, मुलांचे शिक्षण, दैनंदिन खर्च ( किराणामाल, भाजीपाला, घरपट्टी, लाईट, मोबाईल इंटरनेटचं बील वगैरे) यासाठी येणार खर्च हे न टाळता येणारे आहेत (Unavoidable expenses) तरीही आपण वरील पाच गोष्टींच्या फेऱ्यात अडकत असाल तर प्रत्यक्ष लक्ष्मीमातेने तिजोरीत ठाण मांडून बसायचं ठरवलं तरीही तुम्ही तिची हकालपट्टी स्वत:च करत आहात हे लक्षात घ्यावे. "अमुकच वसाहतीत घर हवं, अमुकच प्रकारचे कपडे-कार मी वापरणार कारण मी महत्वाकांक्षी आहे व मला हे हवंच आहे" ही वृ