विद्युत प्रवाहासंबंधी संकलित माहिती

विद्युत प्रवाहासंबंधी संकलित माहिती

*डिसी करंट (डायरेक्ट करंट) यामधे एक धन व दुसरा ऋण  स्थिर प्रवाह असतो. 

* एसी (अल्टरनेटिंग करंट) सप्लाय म्हणजेच सातत्याने वर्तुळाकार (सायनोसायडल) फिरणारा बदलणारा प्रवाह.  शेत,घर,कारखाने, कार्यालयांमधे वापर. 

*२३० व्होल्ट एसी सप्लाय म्हणजेच पहिल्या अर्ध वर्तुळात धन प्रभारित, शुन्य  ते २३० व पुन्हा २३०ते शुन्य व्होल्ट दाब, नंतरच्या अर्ध वर्तुळात ऋण प्रभारित - शुन्य  ते वजा २३० व पुन्हा वजा २३० ते शुन्य व्होल्ट. असा प्रती सेकंदाला पन्नास वेळा प्रवाह बदलतो. 

* विद्युत प्रवाह एका सेकंदामधे १२गेज काॅपर (तांबे) तारेतून  किमान २,८०,००० किमी (दोन लाख ऐंशी हजार किमी) ईतके अंतर जातो. 

*पृथ्वीचा व्यास (डायमेटर) फक्त १२,७४२किमी आहे. 

*आपण प्रवाह चालु केला हे स्वतःस कळेपर्यंत तो ५६,००० किलोमिटर पर्यंत पोहचतो.
 म्हणजेच लाईनवर कोणी काम करत असेल व चुकून प्रवाह चालू केल्यास प्रवाह चालू झाला हे कळेपर्यंत लाईनवर काम करणारी मानसे अपघात ग्रस्त झालेली असतात. 

* विद्युत भारित वाहिनीच्या दोन तारा जवळ आल्यास, अथवा त्यांच्यामधे विद्युत वाहक अाल्यास, एक, दोन किंवा तिनही तारा भु संपर्कात आल्यास फाॅल्ट होवून फाॅल्ट करंटचे पाॅवर ट्रान्सफॉर्मर च्या सेकंडरीमधून वहन होऊन मंडल पुर्ण झाल्यासच, सिटी संरक्षक रिले आॅप्रेट करते व वाहिनीचा सर्किट ब्रेकर ट्रिप होतो. 

*ब-याच वेळा कंडक्टर निखळून (स्नॅपींग) जमीनीवर पडतो, परंतू त्या ठिकाणी सक्षम अर्थिंग केलेली नसल्यास फाॅल्ट करंटचे वहन होत नाही. व रेझीस्टिव फाॅल्ट तयार होतो. त्यामुळे जमीन आणि कंडक्टर दरम्यान वेल्डिंग मशिन प्रमाणे ज्वाला (आर्क) दिसतात. परंतू फिडर (विहिनी) ट्रिप होत नाही. कारण जगात सर्वत्र ईंडक्टिव्ह फाॅल्ट वरच आॅप्रेट होणारे रिले वापरात आहेत. 

* जागतीक व भारतीय विद्युत कायद्यानुसार प्रत्येक विद्युत उपकरण व विद्युत वाहक पोल/ मनोरा किमान दोन ठिकाणी शास्त्रीय पध्दतीने अर्थींग करणे बंधनकारक आहे. व्यवस्थित अर्थिंग नसल्यास फाॅल्ट करंटचे वहन होत नाही. परंतू अज्ञान, बेफिकीरी, भ्रष्ट नितीमत्ता यांमुळे या अत्यावश्यक शास्त्रीय नियमाचे पालन होत नाही. 

* पुर्वीच्या आॅईल व एअर सर्किट ब्रेकरना फाॅल्टवर किंवा फुल लोडवर ट्रिप झाल्यास फिक्स आणि मुव्हींग काँटॅक्ट नाॅर्मल होणेसाठी पाच ते दहा मिनिट लागायाचे. म्हणून पहिल्या ट्रिपींग नंतर पोल फुटू नये म्हणून कंपलसरी पाच ते दहा मिनिटे थांबावे लागत होते.
तसेच त्याकाळी विद्युत पूरवठा हा जनसामांन्यांसाठी  नवीन प्रकार होता. त्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव सुरुवातीला ट्रपिंगचे कारण समजल्या शिवाय वाहिनी चालू करत नसत.  विजेची माहिती झाल्यानंतर,  संबंधित वाहिनीच्या ब्रेकरच्या 'ओपन - क्लोज+ओपन -  क्लोज'  टाईम क्षमतेनुसार ट्रिपींग नंतर टेस्ट  क्लोज ट्रायल घेतल्या जावू लागल्या. 

* हल्लीचे एस एफ सिक्स (सल्फर हेक्झा फ्लोराईड) गॅस सर्किट ब्रेकर व  व्हॅक्युम (निर्वात) सर्किट ब्रेकर पहिल्या ट्रिपींग नंतर १०० ते ३०० मिलीसेकंदात थंड व नाॅर्मल होतात. परंतू दुस-यांदा लगेचच ट्रिप झाल्यास नाॅर्मल होण्यास किमान तीन ते पाच मिनिटे  लागतात. 

*त्या मुळे पहिल्या ट्रिपींग नंतर ब्रेकर क्लोज केल्या नंतर लगेचच ट्रिप झाल्यास, दुस-यांदा चार्ज (प्रभारित) करण्यास कंपलसरी पाच मिनिटे थांबावेच लागते. 
न थांबल्यास रिस्ट्राईकिंग व्होल्टेज मुळे व फाॅल्ट करंटमुळे निर्माण होणाऱ्या प्रचंड ऊष्णतेमुळे, फाॅल्टी फेजचे ब्रेकर पोल फुटण्याची शक्यता आसते. 

* सध्याच्या १३२, २२०, ४०० व ७६५ केव्ही लाईनला तिन फेजला स्वतंत्र मेकॅनिझम ब्रेकर वापरतात. लाईनच्या आधुनिक 'अंतरदर्शक संरक्षक रिले' (डिस्टन्स प्रोटेक्शन रिले) मधे फाॅल्टचे स्वरुप, फाॅल्टच्या ठिकाणाचे अंतर, करंट व वेळेची अचूक नोंद होते. व यातील अंतर्गत (बिल्ट ईन) अटो रिक्लोज फिचरमुळे ज्या फेजवर फाॅल्ट झाला तोच फेज ब्रेकर पोल ट्रिप होतो. ईतर दोन फेज ब्रेकर पोल आॅनच रहातात. टायमरव्दारे १००मिली सेकंदामधे(एक दशांश सेकंद) ट्रिप झालेला ब्रेकर पोल  आॅन करतो. क्षणिक / अल्पकालीन (ट्रान्झियंट) फाॅल्ट असल्यास लाईन चालू रहाते. परंतू जास्त काळ फाॅल्ट राहिल्यास लाईनचे तिनही ब्रेकर पोल अपोआप ट्रिप केले जातात. व लाईन,"ब्रेक डाऊन" डिक्लेअर केली जाते. 

*कोणत्याही  शास्त्र शुध्द उभारणी व मेंटेनन्स केलेल्या फिडरच्या (वाहिनी)  हाय व्होल्टेज (उच्च दाबाच्या) तारेला फाॅल्ट झाल्यावर ट्रिप होण्यास १०० मिली सेकंद ते जास्तीत जास्त ५०० मिली सेकंद म्हणजे अर्धा सेकंद वेळ लागतो. फाॅल्टच्या ठिकाणी अर्थिंग निट नसल्यास फाॅल्ट करंट, जमीनीतून फिडरला विद्युत पुरवठा करणाऱ्या पाॅवर ट्रान्सफॉर्मर पर्यंत वाहून जात नाही. व फाॅल्ट करंटचे मंडल पुर्ण न झाल्याने संबंधित वाहिनीला ट्रिप करणारा रिलेच आॅप्रेट न झाल्याने वाहिनी ट्रिप होत नाही. 
अशी घटना घडल्यास त्वरित संबंधित वाहिनीच्या पोलची / टाॅवरची तात्काळ रिअर्थिंग करावी. 

*अर्थ फाॅल्ट झाल्यास संबंधित फेजचे व्होल्टेज शुन्यवत होवून फाॅल्ट करंट अमर्यादित (ईनफिनीटी) होतो. 

* करंटच्या वर्गाने उष्णता निर्माण होते. 

*उष्णता =करंट वर्ग X रेझिस्टन्स X प्रवाह वाहन्याचा कालावधी

* योग्य क्षमतेची फ्यूज वायर(वितळ तार) वितळण्यास सुध्दा किमान ५०० मिली सेकंद म्हणजे अर्धा सेकंद वेळ लागतो.  

*जगभर व्होल्टेज म्हणजे दोन फेज मधील व्होल्टेज सांगण्याचा प्रघात आहे.  एसी सपलाय मधे  एका फेजमधील व्होल्टेज =दोन फेजमधील व्होल्टेज भागीले वर्गमुळात तीन ईतके आसते. 

*(वर्गमुळात तीन = १.७३२)

* ११केव्ही लाईनच्या एका फेजमधे ११/१.७३२ = ६.३५ किलो व्होल्टेज म्हणजेच ६,३५०व्होल्टेज असते.व 

* ३३ केव्ही लाईनच्या एका फेजमधे ३३/१.७३२ = १९.०५ किलो व्होल्टेज म्हणजेच १९,०५०व्होल्टेजअसते.

*१३२केव्ही लाईनच्या एका फेजमधे १३२/१.७३२ =७६.२१२ किलो व्होल्टेज म्हणजेच ७६ हजार २१२ ईतके व्होल्टेज असते. 

* निरोगी मनुष्याच्या दोन हातामधील विद्युत रेझिस्टन्स सरासरी एक किलो ओहम म्हणजे १००० ओहम असतो. 

*प्राणायम करणारांचा विद्युत रेझिस्टन्स शरिरातील कार्बन कमी झाल्यामुळे १किलोओहम पेक्षा जास्त असतो. 

*भारतातील करंट लक्ष्मण या नांवाने ओळखले जाणारे सुपर ह्युमन यांच्या शरीरातून ५ किलो व्होल्ट पेक्षा जास्त प्रवाह वाहिला तरी त्यांच्यावर काहीही परिणाम होत नाही. 

*कार्बन, कोळसा विजेचा सुवाहक आहे. 

*सर्व  सामान्य मानवी मेंदूच्या नैसर्गिक क्षमतेनुसार कोणतीही क्रिया कळणे व त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी २०० मिलीसेकंद वेळ लागतो.  

* निरोगी मनुष्याच्या शरिरातून १०० मिली अॅम्पिअर किंवा त्यापेक्षा जास्त करंट (प्रवाह) वाहिल्यास श्वसन यंत्रणा बंद पडते. मनुष्य मुर्छित होवून प्रसंगी मृत्यूही ओढावतो. 

* निरोगी मनुष्याच्या शरिरातून १३० किंवा त्यापेक्षा जास्त व्होल्ट, १०० मिली अॅम्पिअर किंवा त्यापेक्षा जास्त करंट (प्रवाह), १००मिली सेकंद किंवा त्यापेक्षा जास्त काळ वाहिल्यास हृदय बंद पडून, श्वसन यंत्रणा बंद पडते. मनुष्य मुर्छित होवून हृदय बंद पडल्यामुळे (कार्डियल अरेस्ट) प्रसंगी मृत्यूही ओढावतो. अशावेळी त्वरित कृत्रिम श्वास देवून अथवा पंपींग करून सर्व प्रथम हृदय सुरू करावे. 

*बंद पडलेले हृदय सरासरी किमान अर्धा तास व त्यापेक्षा जास्त काळ सुस्थितीत राहू शकते. 

*तज्ञ डाँक्टरांचा सल्ला व उपचार घ्यावेत. 

* रोगी, "सवलतीच्या दरातील मनुष्य"  (अल्कोहोल, गर्दूले, तंबाखूसेवक - श्वसन, हृदय रोग, अति चरबीयुक्त) ११० ते १३० व्होल्ट, ५० ते १०० मिली अॅम्पिअर, करंट, ५० ते १०० मिली सेकंद वेळेत काहीही कळण्याच्या आत मृत पावतो. 

*सर्व सामान्य पणे २०० मिलीसेकंदाच्या आत कोणतीच प्रतिक्रिया देता येत नसल्यामुळे स्वतःला आपण मरतो हे कळतच नाही.  तसेच आसपास असणाऱ्यांनाही कळत नाही. त्यामुळे कोणी हाक बोंब मारण्याच्या आतच सर्व घटना घडून जाते. 

* मनुष्याच्या शरिरातून विद्युत प्रवाह जमिनीत वाहिल्यास म्हणजेच अर्थ फाॅल्ट झाल्यास शरिरातून अमर्याद करंट वाहतो व प्रचंड प्रमाणात - लाखो कोटी सेल्सिअस उष्णता तयार होऊन मनुष्याच्या शरीराच्या ज्या भागातून प्रवाह वाहिला तो भाग अंतर्गत भाजतो. बाहेरून भाजलेले प्रमाण दिसण्यासही किमान तीन  दिवस लागतात. 

*स्वर यंत्र गळ्याच्या आतील भागामधे असल्यामुळे त्याला शक्यतो ईजा होत नाही. त्यामुळे मनुष्य शेवटपर्यंत व्यवस्थित बोलू शकतो. 

* विद्युत उपकरण हातळताना प्रामुख्याने हात ते पाय यामधील सर्व अवयवामधून प्रचंड करंट वाहिल्यामुळे प्रचंड उष्णता तयार होउन ते भाजले जातात. भाजल्याचे प्रमाण साधारणपणे तिसऱ्या चौथ्या दिवशी कळते. 

*भाजलेल्या म्हणजे करंट वाहिलेल्या सर्वच भागावर ताबडतोब स्वच्छ पाणी ओतावे. पाण्यातच तोभाग बुडवून ठेवता आल्यास खुपच चांगले. त्यामुळे खोलवर भाजण्याची (डिप पेनिट्रेशन) प्रक्रिया थांबते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाढदिवस आभार

वाढदिवस शुभेच्छा (Birthday Wishesh)

वायरमन - एक संघर्ष कथा