पोस्ट्स

वायरमन - एक संघर्ष कथा

वायरमन                         नाव ऐकल्यावर असे वाटायचे की मी पण वायरमन झालो पाहिजे मला पण वायरमनची नोकरी करायला पाहिजे किती मस्त जीवन असते वायरमनचे सकाळी कामावर जायचे ड्युटी करायची कोणाच्या घराची लाईन बंद असेल तर चालु करायची फ्युज गेला असेल तर तो टाकुन लाईन चालु करायची मग संध्याकाळ झाली का ड्युटी संपल्यावर घरी जायचे आणि आपल्या परिवाराला वेळ द्यायचा छान जिवन जगायचे पब्लिक पण आपल्याला मानसन्मान देतील आपलापण एक वेगळाच रुबाब असेल आपलापण कोणालातरी धाक असेल अस सगळ मनात वायरमनचे चित्र होते.  मग मी पण आयटीआय केला अप्रेंटीस केली आणि आपल्या कामधंद्याला लागलो प्रायवेट वायरमनचे कामसुरु केले नविन नविन खुप त्रास झाला आणि एकदाची सवय झाली रुटीन तस व्यवस्थित चालु होते नंतर महावितरण ची जाहिरात आली ज्युनियर टेक्निशियनची मला वाटल पोस्ट चांगली इम्प्रेसिव आहे  मग मनात पुन्हा वायरमनचे चित्र तयार झाले व त्याविषयी कल्पना पुन्हा मनात पहिल्या सारख्या आठवल्या परिक्षा पास झालो आणि नौकरीवर रुजु झालो कार्यालयात रुजु झालो नविन नविन कोणी जास...

चष्म्याचा नंबर कमी करण्याचे आयुर्वेदिक उपाय

डिजिटल युगात टिव्ही, मोबाईल आणि कॉम्प्युटर समोर तासन्-तास घालवल्याने हल्ली कमी वयातच चष्मा लागण्याचे प्रमाण वाढले आहे. कित्येकांना हा चष्मा नको असतो. तुमचा हा प्रॉब्लेम दूर करण्यासाठी आयुर्वेदात अनेक उपाय आहेत ज्यामुळे दृष्टीमध्ये स्पष्टता येऊन चष्म्याचा नंबर कमी केला जाऊ शकतो. चला तर अशाच काही उपायांबाबत जाणून घेऊयात...  ▪ जीरे आणि खडीसाखर एकत्र प्रमाणात घेऊन वाटा. हे मिश्रण दररोज एक चमचा तुपासोबत घ्या. ▪ दररोज रात्री झोपण्यापूर्वी तिळाच्या तेलाने पायांना मसाज करा. ▪ दररोज ग्रीन टीचे सेवन करा. यातील अँटीऑक्सिडंटस् डोळ्यांना निरोगी राखण्यास मदत करतात. ▪ रात्री त्रिफळा पाण्यात भिजवून सकाळी त्या पाण्याने डोळे धुवा.  ▪ रोज रात्री 6-7 बदाम भिजत घाला आणि सकाळी ते खा. ▪ 3-4 हिरव्या वेलची एक चमचा बडिशेपसोबत वाटा. हे मिश्रण एक ग्लास दुधासोबत घ्या. ▪ गाजराचा ज्यूस नियमित प्यायल्याने डोळ्यांची दृष्टी सुधारते. ▪ एक चमचा बडिशेप, 2 बदाम आणि अर्धा चमचा खडीसाखर एकत्र करुन बारीक पूड करा. रात्री झोपण्याआधी एक ग्लास दुधात हे मिश्रण टाकून प्या. ▪ रोजच्या जेवणात नियमितपणे हिरव्...

Md India Policy Number (mediclaim) Mahavitaran

मेडिक्लेम पॉलिसी 2019 To 2020 सदर क्रमांक महावितरण चे कर्मचारी ज्यानी मेडिक्लेम मध्ये नोंदणी केलेली आहे त्यांच्या करीता आहे. खालील क्रमांक कॉपी करुण पॉलिसी नंबर च्या जागी पेस्ट करावा. नंतर भ.नि.नि क्रमांक टाकून आय कार्ड डाउनलोड करावेत. https://mdindiaonline.com/E-Cardrequest.aspx  दिलेल्या लिंकवर जावून खालील स्टेप कराव्यात... १) The oriental Insurance company Select करा... २) Customer type - Corporate select करा.. ३)  पॉलिसी नंबर     :-     163600/48/19/07956 ४) भ.नि.नि.क्र. टाका त्यानंतर आपल्या परिवारातील सर्व नावे दिसतील.ECard clickकरुण open करावे..ECard Print काढावे..

Marathi Quotes

1) मैत्रीचे धागे कोळ्यापेक्षाही बारीक असतात , पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात ....!! तुटले तर श्वासानेही तुटतील , नाहीतर वज्राघाेतानेही तुटणार नाहीत ....!! 2) संवाद दोनच माणसांचा होतो , त्यांच्यात तिसरा माणूस आला की त्या गप्पा होतात .... !!  3) कोमलतेत प्रचंड सामर्थ्य असतं .... !!  कोमलता म्हणजे दुर्बलता नव्हे .... !! म्हणूनच खडक झिजतात प्रवाह रुंदावत जातो .... !! 4) जाळायला काही नसलं तर पेटलेली   काडीसुद्धा आपोआप विझते .... !! 5) खर्च झाल्याचं दु:ख नसतं , हिशोब   लागला नाही की मग त्रास होतो .... !! 6) प्रॉब्लेम्स कुणाला नसतात ....? ते शेवटपर्यंत असतात .... !! पण प्रत्येक प्राॅब्लेमला उत्तर हे असतंच .... !! ते सोडवायला कधी वेळ हवा असतो ,  कधी पैसा तर कधी माणसं .... !! या तिन्ही गोष्टी पलीकडचा प्राॅब्लेम अस्तित्वातच नसतो .... !! 7) आठवणी या मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात .... !! वारूळ पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अदमास घेता येत नाही . पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एकामागोमाग असंख्य मुंग्या बाहेर पडतात . आठवणींच...

जीवन कसे जगावे ?

कुणाला आपला कंटाळा येईल  इतकं जवळ जाऊ नये चांगुलपणाचे ओझे वाटेल इतके चांगले वागू नये... कुणाला गरज नसेल आपली तिथे रेंगाळत राहू नये... नशीबाने जुळलेली नाती जपावी  पण स्वतःहून तोडू नये... गोड बोलणे गोड वागणे कुणास अवघड वाटू नये... जवळपणाचे बंधन होईल इतके जवळचे होऊच नये... सहजच विसरून जावे सारे सल मनात जपू नये... नकोसे होऊ आपण इतके आयुष्य जगूच नये... हवे हवेसे असतो तेव्हाच पटकन दूर निघून जावे... आपले नाव दुस ऱ्याच्या ओठी राहील इतकेच करून जावे... *कारण* जीवनाच्या वाटेवर  साथ देतात, मात करतात, हात देतात, घात करतात, ती ही असतात..... माणसं ! संधी देतात, संधी साधतात, आदर करतात, भाव खातात ती ही असतात..... माणसं ! वेड लावतात,  वेडं ही करतात, घास भरवतात, घास हिरावतात ती ही असतात..... माणसं ! पाठीशी असतात,  पाठ फिरवतात, वाट दाखवतात ,  वाट लावतात ती ही असतात..... माणसं ! शब्द पाळतात,  शब्द फिरवतात, गळ्यात पडतात,  गळा कापतात ती ही असतात ...... माणसं ! दूर राहतात,  तरी जवळचीच वाटतात, जवळ राहून...

'एन्ग्झायटी डिप्रेशन' लक्षणे आणि उपाय

जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या एका आकडेवारीनुसार 2020 पर्यंत 'एन्ग्झायटी डिप्रेशन' हा जगातील दुसरा मोठा आजार ठरणार आहेत. गेल्या दशकाच्या तुलनेत या आजारात आता 18 टक्क्यांची वाढ झाली आहे. सुमारे 25 टक्के किशोरवयीन भारतीय या आजाराच्या विळख्यात आले आहेत.  आगामी काळात वाढती स्पर्धा, बेरोजगारी, शिक्षणासाठी सुरू असलेली चढाओढ यामुळे हा आजार 2020 पर्यंत आणखी बळावण्याची भीती जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे. विशेषत: तरुणी व महिलांमध्ये हा आजार वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या आजाराबद्दल व त्यावर मात करण्यासाठी असलेल्या उपायांबद्दल जाणून घेऊयात...  🤔 ''एन्ग्झायटी डिप्रेशन' म्हणजे काय? : प्रत्येकाच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्न सुरू असतात. अशात जरा काही बिघडले की मन अस्वस्थ होते. एका मर्यादेपलीकडे गेलेली ही अस्वस्थता व अपेक्षापूर्ती न झाल्याने त्यानंतर येणारे नैराश्य यालाच आपण ''एन्ग्झायटी डिप्रेशन' म्हणू शकतो. 🎯 आजाराची लक्षणे काय? या आजारामुळे शरीरात व मानसिक रचनेत बरेच बदल होतात. हा पूर्णपणे बरा होणा...

आर्थिक चुका टाळायच्या काही पद्धती

दिसेंदिवस महागाई वाढत आहे. त्यामुळे पैशाचे नियोजन करणे कठीण होऊन बसलंय. अशात आपणच केलेल्या काही आर्थिक चूका उदा. नको तेवढा खर्च करणे वा कर्ज काढणे इ. आपणांस खूप वेळा अडचणीत आणतात. म्हणून आपल्याकडून होणाऱ्या 'या' आर्थिक चुका टाळण्यासाठी पुढील गोष्टी ट्राय करायला हरकत नाही.   1) सर्वात प्रथम उगाचच किरकोळ गोष्टींवर खर्च करणे बंद करा. जसं की, ’फर्स्ट डे फर्स्ट शो’ सिनेमा पाहणे किंवा घरूनच जेवणाची ऑर्डर देणे इ. हे खर्च सुरूवातीस छोटे-छोटे वाटत असतात परंतू कालांतराने ही सवय तुम्हाला तुमच्या मिळकतीपेक्षा जास्त खर्च करावयास शिकवते. यावर जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक म्हणजे वॉरन बफेंनी दिलेला सल्ला असा की, मिळकतीतील काही टक्के रक्कम जरूर सेव्हींग करा. 2) महिन्याच्या किंवा वर्षांच्या सुरूवातीस भविष्यात होणाऱ्या खर्चाची यादी आणि त्यासाठी करावी लागणारी जुळणी याचे सारासार प्लॅनिंग करा. महत्वाचं म्हणजे त्या प्लॅनिंगमध्ये सेव्हींगचा देखील विचार करा. 3) प्लॅस्टीक मनी (क्रेडीट/डेबीट कार्ड इ.) ची सूविधा चांगली आहे. परंतू आपण वेळोवेळी क्रेडीट कार्डचा रिपोर्ट बघणे अत्यंत जरूरी आहे. वेळीच ...