पोस्ट्स

Md India Policy Number (mediclaim) Mahavitaran

मेडिक्लेम पॉलिसी 2019 To 2020 सदर क्रमांक महावितरण चे कर्मचारी ज्यानी मेडिक्लेम मध्ये नोंदणी केलेली आहे त्यांच्या करीता आहे. खालील क्रमांक कॉपी करुण पॉलिसी नंबर च्या जागी पेस्ट करावा. नंतर भ.नि.नि क्रमांक टाकून आय कार्ड डाउनलोड करावेत. https://mdindiaonline.com/E-Cardrequest.aspx  दिलेल्या लिंकवर जावून खालील स्टेप कराव्यात... १) The oriental Insurance company Select करा... २) Customer type - Corporate select करा.. ३)  पॉलिसी नंबर     :-     163600/48/19/07956 ४) भ.नि.नि.क्र. टाका त्यानंतर आपल्या परिवारातील सर्व नावे दिसतील.ECard clickकरुण open करावे..ECard Print काढावे..

Marathi Quotes

1) मैत्रीचे धागे कोळ्यापेक्षाही बारीक असतात , पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात ....!! तुटले तर श्वासानेही तुटतील , नाहीतर वज्राघाेतानेही तुटणार नाहीत ....!! 2) संवाद दोनच माणसांचा होतो , त्यांच्यात तिसरा माणूस आला की त्या गप्पा होतात .... !!  3) कोमलतेत प्रचंड सामर्थ्य असतं .... !!  कोमलता म्हणजे दुर्बलता नव्हे .... !! म्हणूनच खडक झिजतात प्रवाह रुंदावत जातो .... !! 4) जाळायला काही नसलं तर पेटलेली   काडीसुद्धा आपोआप विझते .... !! 5) खर्च झाल्याचं दु:ख नसतं , हिशोब   लागला नाही की मग त्रास होतो .... !! 6) प्रॉब्लेम्स कुणाला नसतात ....? ते शेवटपर्यंत असतात .... !! पण प्रत्येक प्राॅब्लेमला उत्तर हे असतंच .... !! ते सोडवायला कधी वेळ हवा असतो ,  कधी पैसा तर कधी माणसं .... !! या तिन्ही गोष्टी पलीकडचा प्राॅब्लेम अस्तित्वातच नसतो .... !! 7) आठवणी या मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात .... !! वारूळ पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अदमास घेता येत नाही . पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एकामागोमाग असंख्य मुंग्या बाहेर पडतात . आठवणींच...

जीवन कसे जगावे ?

कुणाला आपला कंटाळा येईल  इतकं जवळ जाऊ नये चांगुलपणाचे ओझे वाटेल इतके चांगले वागू नये... कुणाला गरज नसेल आपली तिथे रेंगाळत राहू नये... नशीबाने जुळलेली नाती जपावी  पण स्वतःहून तोडू नये... गोड बोलणे गोड वागणे कुणास अवघड वाटू नये... जवळपणाचे बंधन होईल इतके जवळचे होऊच नये... सहजच विसरून जावे सारे सल मनात जपू नये... नकोसे होऊ आपण इतके आयुष्य जगूच नये... हवे हवेसे असतो तेव्हाच पटकन दूर निघून जावे... आपले नाव दुस ऱ्याच्या ओठी राहील इतकेच करून जावे... *कारण* जीवनाच्या वाटेवर  साथ देतात, मात करतात, हात देतात, घात करतात, ती ही असतात..... माणसं ! संधी देतात, संधी साधतात, आदर करतात, भाव खातात ती ही असतात..... माणसं ! वेड लावतात,  वेडं ही करतात, घास भरवतात, घास हिरावतात ती ही असतात..... माणसं ! पाठीशी असतात,  पाठ फिरवतात, वाट दाखवतात ,  वाट लावतात ती ही असतात..... माणसं ! शब्द पाळतात,  शब्द फिरवतात, गळ्यात पडतात,  गळा कापतात ती ही असतात ...... माणसं ! दूर राहतात,  तरी जवळचीच वाटतात, जवळ राहून...

'एन्ग्झायटी डिप्रेशन' लक्षणे आणि उपाय

जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या एका आकडेवारीनुसार 2020 पर्यंत 'एन्ग्झायटी डिप्रेशन' हा जगातील दुसरा मोठा आजार ठरणार आहेत. गेल्या दशकाच्या तुलनेत या आजारात आता 18 टक्क्यांची वाढ झाली आहे. सुमारे 25 टक्के किशोरवयीन भारतीय या आजाराच्या विळख्यात आले आहेत.  आगामी काळात वाढती स्पर्धा, बेरोजगारी, शिक्षणासाठी सुरू असलेली चढाओढ यामुळे हा आजार 2020 पर्यंत आणखी बळावण्याची भीती जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे. विशेषत: तरुणी व महिलांमध्ये हा आजार वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या आजाराबद्दल व त्यावर मात करण्यासाठी असलेल्या उपायांबद्दल जाणून घेऊयात...  🤔 ''एन्ग्झायटी डिप्रेशन' म्हणजे काय? : प्रत्येकाच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्न सुरू असतात. अशात जरा काही बिघडले की मन अस्वस्थ होते. एका मर्यादेपलीकडे गेलेली ही अस्वस्थता व अपेक्षापूर्ती न झाल्याने त्यानंतर येणारे नैराश्य यालाच आपण ''एन्ग्झायटी डिप्रेशन' म्हणू शकतो. 🎯 आजाराची लक्षणे काय? या आजारामुळे शरीरात व मानसिक रचनेत बरेच बदल होतात. हा पूर्णपणे बरा होणा...

आर्थिक चुका टाळायच्या काही पद्धती

दिसेंदिवस महागाई वाढत आहे. त्यामुळे पैशाचे नियोजन करणे कठीण होऊन बसलंय. अशात आपणच केलेल्या काही आर्थिक चूका उदा. नको तेवढा खर्च करणे वा कर्ज काढणे इ. आपणांस खूप वेळा अडचणीत आणतात. म्हणून आपल्याकडून होणाऱ्या 'या' आर्थिक चुका टाळण्यासाठी पुढील गोष्टी ट्राय करायला हरकत नाही.   1) सर्वात प्रथम उगाचच किरकोळ गोष्टींवर खर्च करणे बंद करा. जसं की, ’फर्स्ट डे फर्स्ट शो’ सिनेमा पाहणे किंवा घरूनच जेवणाची ऑर्डर देणे इ. हे खर्च सुरूवातीस छोटे-छोटे वाटत असतात परंतू कालांतराने ही सवय तुम्हाला तुमच्या मिळकतीपेक्षा जास्त खर्च करावयास शिकवते. यावर जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक म्हणजे वॉरन बफेंनी दिलेला सल्ला असा की, मिळकतीतील काही टक्के रक्कम जरूर सेव्हींग करा. 2) महिन्याच्या किंवा वर्षांच्या सुरूवातीस भविष्यात होणाऱ्या खर्चाची यादी आणि त्यासाठी करावी लागणारी जुळणी याचे सारासार प्लॅनिंग करा. महत्वाचं म्हणजे त्या प्लॅनिंगमध्ये सेव्हींगचा देखील विचार करा. 3) प्लॅस्टीक मनी (क्रेडीट/डेबीट कार्ड इ.) ची सूविधा चांगली आहे. परंतू आपण वेळोवेळी क्रेडीट कार्डचा रिपोर्ट बघणे अत्यंत जरूरी आहे. वेळीच ...

"नाही" म्हणायच्या काही खास पद्धती

अनेकदा "नाही" कसं म्हणावं या संकोचामुळे आपण बळजबरीने आपल्याच मनाला मारत "हो" बोलून टाकतो. कदाचित नंतर पश्चाताप देखील होतो. मग अशात प्रश्न पडतो "नाही" म्हणायचं तरी कसं? या प्रश्नाचं उत्तर म्हणजे 'नाही' म्हणा पण अतिशय नम्रपणे. "नाही" म्हणायच्या खालील काही खास पद्धती वापरून तुम्ही "नाही" बोलू शकता...  ▪ "मला मदत करायला खुपच आवडले असते. पण मी बांधील असलेल्या इतर काही कामांमुळे तुमचे काम मला योग्य वेळेत पूर्ण करणे शक्य होणार नाही..." ▪ "क्षमा करा पण सध्या मी जरा व्यस्त असल्याने मला तुमच्या कामासाठी ही वेळ योग्य वाटत नाही. पुढील महिन्यात केले तर नाही का चालणार? " ▪ "तुमची योजना खरंच चांगली आहे. पण तरीही मला विचार करायला काही अवधी लागेल. मी तुम्हाला अमुक एक दिवसांनंतर संपर्क केला तर चालेल का?" ▪ 'अमुक-अमुक' कारणामुळे मला ताबडतोब निर्णय देणे शक्य नाही. तरीही कृपया मला विचार करायला जरा वेळ द्याल का?" ▪ "मला असे वाटते की 'अमुक-अमुक' कारणामुळे मी यासाठी योग्य व्यक्ती नाही. ...

एक कड़ु सत्य

एकदा एका शेतकऱ्याचा घोडा आजारी पडला. ईलाज करण्यासाठी डाॅक्टरला बोलावलं. त्याची व्यवस्थित तपासणी करून डाॅक्टर  म्हणाले "तुमच्या घोड्याला गंभीर आजार आहे.  आपण तीन दिवस त्याला औषध देऊन पाहू.... ठिक झाला तर ठिक.... अन्यथा आपल्याला त्याला विषारी इंजेक्शन देऊन मारावं लागेल. कारण हा आजार तुमच्या दुसऱ्या प्राण्यांना होऊ शकतो." हे सर्व शेजारी असलेला बकरा ऐकत असतो. डाॅक्टर त्याला औषध देतो अन् निघून जातो , तसा बकरा त्याच्याजवळ जातो व म्हणतो "उठ मित्रा, जरा हालचाल करण्याचा प्रयत्न कर नाहीतर हे लोक तुला मारतील." दुसऱ्या दिवशी पुन्हा डाॅक्टर घोड्याला औषध पाजून निघून जातो. डाॅक्टर गेल्यावर बकरा घोड्याजवळ येतो अन् म्हणतो "मित्रा, धीर धर, हवं तर मी तुला मदत करतो जरा उभं राहण्याचा प्रयत्न कर.चल उठ".पण घोडा तसाच पडलेला.. तिसऱ्या दिवशी डाॅक्टर शेतकऱ्यांला म्हणाला "नाईलाज आहे पण आता याला मारावं लागले. याचे शरीर औषधालाही साथ देत नाही." जेव्हा डाॅक्टर निघून गेला तेंव्हा बकरा घोड्याला म्हणाला "मित्रा, आता तुझ्यावर करा किंवा मरा अशी वेळ आलीय....