पोस्ट्स

"नाही" म्हणायच्या काही खास पद्धती

अनेकदा "नाही" कसं म्हणावं या संकोचामुळे आपण बळजबरीने आपल्याच मनाला मारत "हो" बोलून टाकतो. कदाचित नंतर पश्चाताप देखील होतो. मग अशात प्रश्न पडतो "नाही" म्हणायचं तरी कसं? या प्रश्नाचं उत्तर म्हणजे 'नाही' म्हणा पण अतिशय नम्रपणे. "नाही" म्हणायच्या खालील काही खास पद्धती वापरून तुम्ही "नाही" बोलू शकता...  ▪ "मला मदत करायला खुपच आवडले असते. पण मी बांधील असलेल्या इतर काही कामांमुळे तुमचे काम मला योग्य वेळेत पूर्ण करणे शक्य होणार नाही..." ▪ "क्षमा करा पण सध्या मी जरा व्यस्त असल्याने मला तुमच्या कामासाठी ही वेळ योग्य वाटत नाही. पुढील महिन्यात केले तर नाही का चालणार? " ▪ "तुमची योजना खरंच चांगली आहे. पण तरीही मला विचार करायला काही अवधी लागेल. मी तुम्हाला अमुक एक दिवसांनंतर संपर्क केला तर चालेल का?" ▪ 'अमुक-अमुक' कारणामुळे मला ताबडतोब निर्णय देणे शक्य नाही. तरीही कृपया मला विचार करायला जरा वेळ द्याल का?" ▪ "मला असे वाटते की 'अमुक-अमुक' कारणामुळे मी यासाठी योग्य व्यक्ती नाही. ...

एक कड़ु सत्य

एकदा एका शेतकऱ्याचा घोडा आजारी पडला. ईलाज करण्यासाठी डाॅक्टरला बोलावलं. त्याची व्यवस्थित तपासणी करून डाॅक्टर  म्हणाले "तुमच्या घोड्याला गंभीर आजार आहे.  आपण तीन दिवस त्याला औषध देऊन पाहू.... ठिक झाला तर ठिक.... अन्यथा आपल्याला त्याला विषारी इंजेक्शन देऊन मारावं लागेल. कारण हा आजार तुमच्या दुसऱ्या प्राण्यांना होऊ शकतो." हे सर्व शेजारी असलेला बकरा ऐकत असतो. डाॅक्टर त्याला औषध देतो अन् निघून जातो , तसा बकरा त्याच्याजवळ जातो व म्हणतो "उठ मित्रा, जरा हालचाल करण्याचा प्रयत्न कर नाहीतर हे लोक तुला मारतील." दुसऱ्या दिवशी पुन्हा डाॅक्टर घोड्याला औषध पाजून निघून जातो. डाॅक्टर गेल्यावर बकरा घोड्याजवळ येतो अन् म्हणतो "मित्रा, धीर धर, हवं तर मी तुला मदत करतो जरा उभं राहण्याचा प्रयत्न कर.चल उठ".पण घोडा तसाच पडलेला.. तिसऱ्या दिवशी डाॅक्टर शेतकऱ्यांला म्हणाला "नाईलाज आहे पण आता याला मारावं लागले. याचे शरीर औषधालाही साथ देत नाही." जेव्हा डाॅक्टर निघून गेला तेंव्हा बकरा घोड्याला म्हणाला "मित्रा, आता तुझ्यावर करा किंवा मरा अशी वेळ आलीय....

कोणत्या राशींची जोडी बनते Best Couple ?

▪ तूळ आणि सिंह - लोकांशी संवाद साधणे, हसतमुख राहणे यांना आवडते. या दोनही राशींचा स्वभाव जवळपास सारखाच असतो, त्यामुळे त्यांचे चांगले जुळू शकते. ▪ मेष आणि कुंभ - हे आपल्या जोडीदाराला स्पेस देणे पसंत करतात. तसेच एकमेकांच्या सहमतीने उत्तम निर्णय घेऊ शकतात. या दोन राशींच्या व्यक्ती एकत्र आल्याल उत्तम जोडीदार बनू शकतात. ▪ मेष आणि कर्क - मेष राशीच्या व्यक्ती हुशार असतात. तसेच निडर असतात. यांची जोडी चांगली जमू शकते. ▪ मेष आणि मीन - मेष आणि मीन राशीच्या व्यक्ती एकत्र आल्यास त्यांच्यात प्रेमळ संबंध तयार होतात. मेष राशींच्या व्यक्ती चांगले नेतृत्व करु शकतात. त्यामुळे एक चांगली दिशा मिळू शकते. ▪ वृषभ आणि कर्क - वृषभ राशीच्या व्यक्ती नेहमी मदतीसाठी तत्पर असतात. दोघेही कुटुंबाचे महत्त्व जाणतात. शिवाय दोघेही एकमेकांचा आदर करणारे असतात. त्यामुळे ते उत्तम जोडीदार बनू शकतात.  ▪ वृषभ आणि मकर - वृषभ राशींच्या व्यक्ती नेहमी चांगल्या कामाचे कौतुक करणाऱ्या असतात. त्यामुळेच त्यांचे मकर राशींच्या व्यक्तीशी चांगले पटते. हे दोघेही एकमेकांसोबत प्रेम आणि समजुतदारीने राहू शकतात. ▪ मेष आणि धनू - धनु...

आयुष्याचे आर्थिक नियोजन

अचानक कंपनी बंद पडणं , कंत्राट संपण, जॉब जाणं, व्यवसाय अडचणीत येणं, उत्पन्न एकदम कमी होण  हे कोणाच्याही  आणि केंव्हाही वाट्याला येऊ शकतं  त्रास होणं , झोप उडन , काळजी वाटणं स्वाभाविक आहे  पण हिंमत हारू नका ! मात्र काही निर्णय ताबडतोब घ्यावे लागतील चार रूम मध्ये राहात असाल दोन रूम मध्ये रहा  दोन मध्ये रहात असाल एक मध्ये जा  फोर व्हीलर वापरत असाल  टू व्हीलर घ्या  चारिठाव स्वयंपाक होत असेल  फक्त पोळी-भाजी वर या  काही loan घेतलेले असेल तर ते Clear करण्याचा प्रयत्न करा ! नातेवाईकाला शिव्या देऊ नका फालतू डायलॉगबाजी अगोदर बंद करा वेळच येऊ नये , कुणीच कुणाचं नसतं त्याच त्या घिस्यापिट्या कॅसेट्स वाजउ नका ! शंभर पैकी दोन चार जण नक्की मदत करत असतात  त्यांचं नाव घ्या 96 जणांना नावं ठेवण्या पेक्षा 4 जणांना चांगलं म्हणा ! थोडक्यात काय , आपला आर्थिक स्रोत कमी झाला आहे  हे समजून घ्या  आणि गरजा कमी करा ! अजून एक महत्वाची गोष्ट  अशा प्रसंगी ....... बायकोने नवऱ्याला साथ देणे  खूप गरजेचे आहे  ...

अँड्रॉइड स्मार्टफोन लॉक झालाय ? डोन्ट वरी… ही ट्रिक वापरा

▪ स्मार्टफोनचा पॅटर्न लॉक किंवा पासवर्ड विसरलात तर एक मेमरी कार्ड आणि एक एक्स्ट्रा स्मार्टफोन गरजेचा आहे. या दुसऱ्या स्मार्टफोनमध्ये हे मेमरी कार्ड insert करा. ▪ नंतर या स्मार्टफोन मधून Aroma File Manager हे अॅप्लिकेशन डाउनलोड करा, हे अॅप्लिकेशन मेमरी कार्ड मध्ये move करा, त्यानंतर हे मेमरी कार्ड तुमच्या locked झालेल्या स्मार्टफोनमध्ये insert करा. ▪ तुमच्या locked झालेल्या स्मार्टफोनची Power Key आणि Volume up key एकाच वेळी दाबून Recovery Mode ओपन करा. ( Recovery Mode ओपन करण्यासाठी प्रत्येक फोनचे Key Combination वेगवेगळे असतात. ) ▪ या Recovery Mode मध्ये गेल्यावर Install Zip from SD Card हा पर्याय निवडा, Install Zip from SD Card पर्याय निवडल्यावर SD कार्ड मधून Aroma File Manager चा path निवडून ते install करा ▪ Aroma File Manager अॅप्लिकेशन install झाल्यावर ते पुन्हा Recovery Mode मध्ये ओपन होईल. ▪ या Aroma File Manager मधून settings मध्ये जावे, त्यात तुम्हाला सर्वात शेवटी Automount all devices on start हा पर्याय दिसेल. त्या या पर्यायावर क्लिक करा आणि exit करा. ▪ पुन्हा Ins...

स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी खास टिप्स

▪ दुसऱ्यांसोबत आपल्या स्वतःलासुद्धा ट्रीट कसं करायचं ते शिका ▪ नवीन काही शिकण्यासाठी तयार रहा ▪ नवीन कौशल्ये, छंद आणि भाषा आत्मसात करा ▪ प्रेरणा देणाऱ्यांच्या सहवासात रहा ▪ तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींची डायरी लिहायला शिका ▪ नकारात्मक माणसे बाजूला करा आणि सकारात्मक माणसे आणि विचार आत्मसात करा ▪ नेहमी तुमच्या कामांची आणि वेळेची आखणी करा ▪ कामाच्या सगळ्या व्यापात थकल्यासारखे वाटल्यास जरा ब्रेक घ्या ▪ व्यायाम आणि मेडिटेशन करा ▪ भूताळात घडलेले सोडून द्या, वर्तमानात जगा

डाव्या कुशीवर झोपण्याचे फायदे

☑ डाव्या कुशीवर झोपल्यामुळे आपल्या हृदयावर दबाव जाणवत नसल्याने हृदय योग्य पद्धतीने काम करतं. यामुळे हृदयाचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. ☑ डाव्या कुशीवर झोपल्यामुळे शरीरातील विभिन्न अंग आणि मेंदूपर्यंत रक्तात ऑक्सिजनचा प्रवाह सुरळीत होतो. याने शरीराचे सर्व अंग निरोगी राहतात आणि चांगल्या प्रकारे कार्य करतात. ☑ डाव्या कुशीवर झोपल्यामुळे गर्भवती स्त्रियांसाठी डाव्या कुशीवर झोपणे योग्य आहे कारण याने गर्भात वाढत असलेल्या बाळाच्या प्रकृतीवर विपरित परिणाम होत नाही. याव्यतिरिक्त टाचा, हाता आणि पायांमध्ये सूज येण्याची समस्या दूर होते. ☑ डाव्या कुशीवर झोपल्यामुळे रक्त प्रवाह सुरळीत होत असल्याने झोप पूर्ण होते. या स्थितीत झोपून उठल्यावर थकवा जाणवत नाही आणि पोटासंबंधी समस्याही दूर होतात. ☑ पचन क्रिया सुरळीत होते आणि पाचक प्रणालीवर अतिरिक्त दबाव येत नाही. डाव्या बाजूकडे झोपल्याने शरीरात जमा होत असलेले टॉक्सिन लसिका वाहिनी तंत्राद्वारे बाहेर पडतात. ☑ बद्धकोष्ठतेची तक्रार असलेल्यांनी डाव्या कुशीवर झोपायला हवे. आराम मिळेल. गुरुत्वाकर्षणामुळे अन्न लहान आतड्यातून मोठ्या आतड्यात पद्धतशीर ढक...