पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

"नाही" म्हणायच्या काही खास पद्धती

अनेकदा "नाही" कसं म्हणावं या संकोचामुळे आपण बळजबरीने आपल्याच मनाला मारत "हो" बोलून टाकतो. कदाचित नंतर पश्चाताप देखील होतो. मग अशात प्रश्न पडतो "नाही" म्हणायचं तरी कसं? या प्रश्नाचं उत्तर म्हणजे 'नाही' म्हणा पण अतिशय नम्रपणे. "नाही" म्हणायच्या खालील काही खास पद्धती वापरून तुम्ही "नाही" बोलू शकता...  ▪ "मला मदत करायला खुपच आवडले असते. पण मी बांधील असलेल्या इतर काही कामांमुळे तुमचे काम मला योग्य वेळेत पूर्ण करणे शक्य होणार नाही..." ▪ "क्षमा करा पण सध्या मी जरा व्यस्त असल्याने मला तुमच्या कामासाठी ही वेळ योग्य वाटत नाही. पुढील महिन्यात केले तर नाही का चालणार? " ▪ "तुमची योजना खरंच चांगली आहे. पण तरीही मला विचार करायला काही अवधी लागेल. मी तुम्हाला अमुक एक दिवसांनंतर संपर्क केला तर चालेल का?" ▪ 'अमुक-अमुक' कारणामुळे मला ताबडतोब निर्णय देणे शक्य नाही. तरीही कृपया मला विचार करायला जरा वेळ द्याल का?" ▪ "मला असे वाटते की 'अमुक-अमुक' कारणामुळे मी यासाठी योग्य व्यक्ती नाही.

एक कड़ु सत्य

एकदा एका शेतकऱ्याचा घोडा आजारी पडला. ईलाज करण्यासाठी डाॅक्टरला बोलावलं. त्याची व्यवस्थित तपासणी करून डाॅक्टर  म्हणाले "तुमच्या घोड्याला गंभीर आजार आहे.  आपण तीन दिवस त्याला औषध देऊन पाहू.... ठिक झाला तर ठिक.... अन्यथा आपल्याला त्याला विषारी इंजेक्शन देऊन मारावं लागेल. कारण हा आजार तुमच्या दुसऱ्या प्राण्यांना होऊ शकतो." हे सर्व शेजारी असलेला बकरा ऐकत असतो. डाॅक्टर त्याला औषध देतो अन् निघून जातो , तसा बकरा त्याच्याजवळ जातो व म्हणतो "उठ मित्रा, जरा हालचाल करण्याचा प्रयत्न कर नाहीतर हे लोक तुला मारतील." दुसऱ्या दिवशी पुन्हा डाॅक्टर घोड्याला औषध पाजून निघून जातो. डाॅक्टर गेल्यावर बकरा घोड्याजवळ येतो अन् म्हणतो "मित्रा, धीर धर, हवं तर मी तुला मदत करतो जरा उभं राहण्याचा प्रयत्न कर.चल उठ".पण घोडा तसाच पडलेला.. तिसऱ्या दिवशी डाॅक्टर शेतकऱ्यांला म्हणाला "नाईलाज आहे पण आता याला मारावं लागले. याचे शरीर औषधालाही साथ देत नाही." जेव्हा डाॅक्टर निघून गेला तेंव्हा बकरा घोड्याला म्हणाला "मित्रा, आता तुझ्यावर करा किंवा मरा अशी वेळ आलीय.

कोणत्या राशींची जोडी बनते Best Couple ?

▪ तूळ आणि सिंह - लोकांशी संवाद साधणे, हसतमुख राहणे यांना आवडते. या दोनही राशींचा स्वभाव जवळपास सारखाच असतो, त्यामुळे त्यांचे चांगले जुळू शकते. ▪ मेष आणि कुंभ - हे आपल्या जोडीदाराला स्पेस देणे पसंत करतात. तसेच एकमेकांच्या सहमतीने उत्तम निर्णय घेऊ शकतात. या दोन राशींच्या व्यक्ती एकत्र आल्याल उत्तम जोडीदार बनू शकतात. ▪ मेष आणि कर्क - मेष राशीच्या व्यक्ती हुशार असतात. तसेच निडर असतात. यांची जोडी चांगली जमू शकते. ▪ मेष आणि मीन - मेष आणि मीन राशीच्या व्यक्ती एकत्र आल्यास त्यांच्यात प्रेमळ संबंध तयार होतात. मेष राशींच्या व्यक्ती चांगले नेतृत्व करु शकतात. त्यामुळे एक चांगली दिशा मिळू शकते. ▪ वृषभ आणि कर्क - वृषभ राशीच्या व्यक्ती नेहमी मदतीसाठी तत्पर असतात. दोघेही कुटुंबाचे महत्त्व जाणतात. शिवाय दोघेही एकमेकांचा आदर करणारे असतात. त्यामुळे ते उत्तम जोडीदार बनू शकतात.  ▪ वृषभ आणि मकर - वृषभ राशींच्या व्यक्ती नेहमी चांगल्या कामाचे कौतुक करणाऱ्या असतात. त्यामुळेच त्यांचे मकर राशींच्या व्यक्तीशी चांगले पटते. हे दोघेही एकमेकांसोबत प्रेम आणि समजुतदारीने राहू शकतात. ▪ मेष आणि धनू - धनु राश