पोस्ट्स

ऑगस्ट, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्वतःचे आयुष्य

पालकांना माझे एवढेच सांगणे आहे की, प्रथम स्वत:चे आयुष्य जगा, तुमच्या ऐपतीनुसार मुलांना फक्त १२ वी पर्यंतचे शिक्षण द्या, त्यानंतर पार्टटाइम नोकरी व व्यवसाय करून त्याचे शिक्षण व त्याला जगण्याएवढा पैसा स्वतः कमवण्यास सांगा, ऐतखाऊ सवय तुम्ही लावली तर तुम्ही तुमच्या कुंटुबाचा सर्वनाश स्वत: करून घेत आहात हे लक्षात घ्या. उतार वयामध्ये आजाराला सामोरे जावे लागू नये यासाठी आतापासूनच चांगला आहार घ्या, स्वत:चा जीव मारून मुलांचे शिक्षण, घर, लग्न, नोकरीसाठी प्रयत्न करू नका. १२ वी नंतरच तुमच्या मुलाला काम करण्याची सवय लागली की त्याला जग, पैसा, मेहनत याचे महत्त्व कळेल, आयते बसून घातले तर तो पोल्ट्रीच्या कोंबडीप्रमाणे केवळ मांसाचा गोळाच होईल. उलट त्याला व्यवसायाच्या जगात लवकर सोडले तर तो गरुडाप्रमाणे ताकदवान, शूर, चपळ, चाणाक्ष व स्वावलंबी होईल, १८ वर्षे पूर्ण झालेला नागरिक देश चालवू शकतो मग स्वत:चं आयुष्य का नाही.

गणितातील काही महत्वाची एकके

१)    १  मिनिट = ६० सेकंद . (२)    १  तास = ६० मिनिटे . (३)    २४ तास  = १ दिवस . (४)    पाव तास =१५ मिनिटे.  (५)    अर्धा तास =३० मिनिटे.  (६)     पाऊण तास= ४५ मिनिटे . (७)     ७ दिवस = १ आठवडा. (८)     ३० दिवस = १ महिना. (९)     ३६५ दिवस =१ वर्ष . (१०)   १० वर्ष = १ दशक . (११)   अर्धा वर्ष = ६ महिने . (१२)   पाव वर्षे = ३ महिने . (१३)    १ वाजून ३० मिनिटे = दीड वाजतात. (१४)    २ वाजून ३० मिनिटे = अडीच वाजतात . (१५)    एकशे =१०० (१६)    अर्धाशे =५० (१७)    पावशे =२५ (१८)    पाऊणशे =७५ (१९)    सव्वाशे =१२५  (२०)    दीडशे = १५० (२१)    अडीचशे =२५० (२२)    साडेतीनशे =३५० (२३)    १डझन=  १२ वस्तू  (२४)    अर्धा डझन =६ वस्तू  . (२५)    पाव डझन=३ वस्तू (२६)    पाऊण डझन=९ वस्तू  (२७)    २४ कागद = १ दस्ता (२८)    २० दस्ते=१ रीम (२९)    ४८० कागद = १  रीम (३०)   १ गुंठे=  १०८९ चौ .मी (३१)    १ हेक्टर =१०० आर ३२ )    १एकर= ४००० चौ .मी  (३३)   १मीटर= १०० सेंटिमीटर  (३४)    अर्धा  मीटर= ५० सेंटिमीटर  (३५)    पाव मीटर = २५ सेंटिमीटर  (३६)    पाऊण मीटर =७५ सेंटिमीट